Dharashiv News: यंदा झालेल्या अतिपावसामुळे पेरणी कालावधी मागे-पुढे झाला आहे. त्यामुळे ज्वारी, हरभरा पिकांच्या वाढीची स्थिती कमी-अधिक आहे. ज्वारी कुठे पोटऱ्यात, तर कुठे ईतभरच आहे. हरभरा देखील काही ठिकाणी फुलोऱ्यात आणि काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे यंदा रब्बीची काढणी म्हणजेच सुगीचे दिवस कुठे लवकर तर कुठे उशिरा येणार आहेत..जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्या सरासरी क्षेत्राच्या ९६.१ टक्के म्हणजे ४ लाख १ हजार ६१७ हेक्टरवर पूर्ण झाल्या आहेत. ज्वारीची सरासरी एक लाख ६२ हजार ५०९ हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख ५१ हजार २०५ हेक्टरवर म्हणजेच सरासरी ९३.४ टक्के पेरणी झाली आहे..तर हरभऱ्याची सरासरी दोन लाख ८ हजार ५७४ क्षेत्रापैकी एक लाख ९१ हजार ५१६ हेक्टर म्हणजेच ९१.८२ टक्के पेरणी झाली आहे..Rabi Season: धाराशिवमध्ये ज्वारीही डोलू लागली, हरभऱ्याने बहरले रान.जिल्ह्यात रब्बीचे सरासरी चार लाख १७ हजार ९०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ४ लाख एक हजार ६१७ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात ज्वारी आणि हरभरा या दोन प्रमुख पिकांचे सर्वाधिक क्षेत्र आहे. या पिकांच्या सरासरी पेरणीत ज्वारी, तर क्षेत्रनिहाय पेरणीत हरभरा अधिक आहे. .Rabi Season: मोहोळमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी पिके जोमात.मक्याची पेरणी यंदा सरासरी ओलांडून दीडपट क्षेत्राच्या जवळपास गेली आहे. मक्याची पेरणी सरासरीच्या तब्बल १४२. ६२ टक्क्यांवर झाली आहे. .६ हजार २२८ हेक्टर सरासरी क्षेत्र असलेल्या मक्याची ८ हजार ८८३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाची सरासरी २५ हजार ८५५ हेक्टरपैकी २३ हजार ९६३ हेक्टरवर म्हणजे ९२.६८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.