Deadly Amoeba Infection: पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी पाण्यामध्ये मुक्तपणे वावरत असलेल्या एकपेशीय सूक्ष्मजीवांविषयी धोक्याचा इशारा दिला आहे. हे अमिबा माणसांमध्ये मेंदूविषयक प्राणघातक आजारासाठी कारणीभूत ठरतात. ते सध्या शुद्ध पाणी पुरवठ्याच्या विविध प्रणालीमध्येही टिकून राहत असल्याने धोक्याचे प्रमाण अधिकच वाढत आहे. ही माहिती बायोकन्टामिनंट या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. .अमिबा हे एकपेशीय जीव सामान्यतः माती आणि पाण्यात नैसर्गिकरीत्या आढळतात. बहुतेक अमीबा निरुपद्रवी असलेतरी त्यांचे काही प्रकार मात्र गंभीर आजार निर्माण करतात. त्यातील नेग्लेरिया फाउलेरी (Naegleria fowleri) हा त्यातील प्रसिद्ध प्रकार असून, त्याला ‘मेंदू खाणारा अमीबा’ म्हणून ओळखले जाते. त्याचा संसर्ग नाकातून दूषित पाणी शरीरात गेल्यास होतो. अशा प्रकारे नाकात पाणी जाण्याचा धोका पोहताना जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे मेंदूचा ‘प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिस (PAM)’ हा दुर्मीळ व बहुतेक वेळा प्राणघातक ठरणारा आजार होतो..Bad Foods For Brain Health : 'हे' पदार्थ खाणं आत्ताच करा बंद, नाहीतर स्मरणशक्ती होईल कमी.या अमिबाविषयी माहिती देताना सन यॅट-सेन विद्यापीठातील प्रा. लॉन्गफेई शू म्हणाले, की नेग्लेरिया फाउलेरी हे अमिबा उच्च तापमानही सहन करू शकतात. पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाणारी क्लोरीनसारखी जंतुनाशकेही त्यांना मारू शकत नाहीत. त्यामुळे हवामान बदलाच्या काळात वाढत्या तापमानामध्ये त्यांचे प्रमाण वाढत आहे..Brain Eating Amoeba: केरळमध्ये वाढणारा ‘ब्रेन-ईटिंग अमीबा’ नक्की आहे काय?.हे सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा प्रणालीतही राहू शकतात. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे हे अमिबा अन्य जिवाणू आणि विषाणूंच्या वहन करत असल्याने धोक्याचे प्रमाण आणखी वाढते. याला ‘ट्रोजन हॉर्स’ परिणाम म्हणतात. यामुळे प्रतिजैविक प्रतिकारशक्तीही वाढू शकते..शास्त्रज्ञांनी एकाच आरोग्य उपचार व व्यवस्थापन पद्धतीवर भर दिला आहे. त्यांच्या मते मानवी आरोग्य, पर्यावरण आणि पाणी व्यवस्थापन यांचा समन्वय आणि कठोर निगराणी आवश्यक आहे. पाणी शुद्धीकरणाच्या पद्धतीमध्ये योग्य ते बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आधुनिक तपासणी व शुद्धीकरण साधने वापरण्याची गरज आहे..विशेषतः पाण्याशी संबंधित मनोरंजनाच्या खेळांमध्ये अमिबांच्या प्रसाराचा मोठा धोका दिसत आहे. त्यामुळेच अमिबा हा फक्त वैद्यकीय किंवा पर्यावरणीय प्रश्न राहिलेला नाही, तर तो लोकांच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनत आहे. त्यापासून संरक्षणासाठी मुळापासूनच प्रयत्न करावे लागतील, असे शू म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.