Mumbai News: राज्य सरकारने जाहीर केलेल्या अतिवृष्टिग्रस्तांच्या पॅकेजच्या नावावर भोपळा दिल्याची टीका विरोधकांसह डाव्या संघटनांनी केली आहे. हे तुटपुंजे पॅकेज असल्याचे सांगून ५० हजार हेक्टरी मदत करावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी पॅकेजवर टीका केली असून शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिल्याची टीका केली आहे..काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले, की अतिवृष्टी व पुराने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेला आहे, पण रब्बीचा हंगामही हाती लागणार नाही अशी अवस्था आहे. शेतीच्या नुकसानीसोबत शेतकऱ्यांचे घरदार- संसार उघड्यावर पडले आहेत, परंतु भाजप महायुती सरकारने मात्र नुकसान भरपाईच्या नावाने फसवणूक केली आहे..Flood Damage Relief: पशुधनासाठी राज्य सरकारची मदत जाहीर; प्रति दुधाळ जनावरासाठी मिळणार ३७ हजार ५०० रुपये.लाखोंचे नुकसान झाले असताना सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी असून उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका केली आहे. तसेच सरकारने सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी व आश्वासन पाळून कर्जमाफी करावी. राज्यातील ३० जिल्ह्यांतील जवळपास ३०० तालुक्यांत अतिवृष्टी व महापुराने थौमान घातले आहे. सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ५ लाख रुपये व कर्जमाफी करावी, अशी मागणी केली आहे..Maharashtra Farmer Relief : दुष्काळाच्या सवलती अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांनाही लागू; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा.६५०० कोटींचे पॅकेज; बाकी गोळाबेरीज : डॉ. नवलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार आकर्षकपणाने महाराष्ट्रापुढे पॅकेज मांडले. केवळ ६५०० कोटींचे हे पॅकेज आहे. बाकी सर्व गोळाबेरीज असल्याची टीका डॉ. अजित नवले यांनी केली. ते म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी ही महामदत असल्याचेही त्यांनी भासवले. मात्र पॅकेजचे आर्थिक विश्लेषण केले असता यापैकी बहुतांशी रक्कम ही यापूर्वी जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजनांची बेरीज असून ३१ हजार ६२८ कोटी रुपयांपैकी केवळ रब्बी हंगाम उभा करण्यासाठी देऊ केलेले ६५०० कोटी रुपये नवी तरतूद आहे..उर्वरित संपूर्ण पॅकेज हे यापूर्वीच वेळोवेळी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जाहीर केलेल्या योजनांच्या रकमांची बेरीज आहे. पॅकेजमध्ये पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या संभाव्य भरपाईचा समावेश करण्यात आला आहे. खरवडून गेलेली शेती पुन्हा दुरुस्त करण्याच्या या कामांचा समावेश रोजगार हमी योजनेत करण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेसाठी केलेली केंद्र सरकार व राज्य सरकारची तरतूद ही अर्थसंकल्पातील तरतूद आहे. राज्य सरकारला यामध्ये नव्याने एक रुपयाचाही खर्च नाही..शेतकऱ्यांची थट्टामहायुती सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबरमध्ये ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीमध्ये गेल्या १५ दिवसांत ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना आज फक्त सरकारने मदतीचे आकडे फुगवून सांगत ही तर सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. .राज्यात शेतकऱ्यांची जमीन खरवडून निघाली आहे. त्यांची जनावरे वाहून गेली आहेत, अशा वेळी शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत करण्याची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. शेतकऱ्यांबरोबर शेतमजूरदेखील अडचणीत आला आहे, त्यांना काय मदत मिळणार, असा प्रश्न श्री. वडेट्टीवर यांनी उपस्थित केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.