Chandigarh News: ‘‘पूरग्रस्त पंजाबला केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेला एक हजार ६०० कोटी रुपयांचा आर्थिक निधी हा बचाव कार्यासाठी तातडीने देण्यात आलेल्या ‘टोकन’ स्वरुपाचा आहे, भविष्यात पंजाबला केंद्राकडून आणखी मदत मिळणार आहे,’’ असे आश्वासन पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी बुधवारी दिले. .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंजाबला भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पंजाबला एक हजार ६०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मात्र, यावरून पंजाबमधील आप सरकारच्या मंत्र्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ‘‘पंजाबचे सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असताना पंतप्रधानांनी केवळ एक हजार ६०० कोटी रुपयांचा आर्थिक निधी जाहीर करून पंजाबची क्रूर थट्टा केली आहे असून हा पंजाबचा अपमान आहे, ’’ अशा संतप्त प्रतिक्रिया पंजाब सरकारमधील मंत्र्यांकडून व्यक्त होत आहेत..Punjab Flood Crisis: पंजाबला पुराचा तडाखा; १२०० गावे जलमय, ३० जणांचा मृत्यू तर शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान.रुग्णालयात उपचार घेत असलेले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेण्यासाठी मोहाली येथे आले असता कटारिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंजाब सरकारला केंद्राने आधीच बाराशे कोटी रुपये दिले असून त्याव्यतिरिक्त हे एक हजार ६०० कोटी रुपये देण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले..मोदींनी पंजाबीचा अपमान केलापंतप्रधान मोदी यांनी पंजाब दौऱ्यादरम्यान गुरदासपूर येथे पंजाबमधील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पंजाबी भाषेचा अपमान केला, असा आरोप पंजाबचे अर्थमंत्री हरपालसिंग चिमा यांनी केला आहे. ते म्हणाले, या बैठकीत पंजाब सरकारमधील मंत्री हरदीपसिंग मुंडिआ उपस्थित होते..Punjab Flood: पंजाबमधील पूर संकट; केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहानांनी आढावा घेतला.पंतप्रधान मोदी यांनी एक हजार ६०० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केल्यावर, हरदीपसिंग यांनी, हा निधी तुटपुंजा असल्याचे पंतप्रधानांना सांगितले आणि किमान वीस हजार कोटींची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली. त्यावेळी मोदी हरदीपसिंग यांना म्हणाले की, पंजाबला एक हजार ६०० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे, तुम्हाला हिंदी समजत नाही का?’’ असे विचारून पंतप्रधानांनी पंजाबी भाषा आणि पंजाबी नागरिकांचा अपमान केला आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला..पंतप्रधानांचा हा दौरा म्हणजे केवळ फोटो काढण्यासाठी होता. आमचे राज्य गेल्या कित्येक आठवड्यांपासून अभूतपूर्व नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना इतक्या दिवसांनी अखेर ते पंजाबमध्ये आले आणि राज्यासाठी अत्यंत तुटपुंज्या आर्थिक मदतीची घोषणा केली.हरपाल सिंग चिमा, अर्थमंत्री, पंजाब.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.