Sangli News: रब्बी पिकासाठी लोकांच्या मागणीनुसार वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पहिले आवर्तन सुरू करण्यात आले आहे. करमजाई तालावातून मानकरवाडी येथील वितरण कुंडात पाणी पोहोचले आहे. हे पाणी पुढे पूर्व भागासाठी शिवपुरी, वाघवाडी, जांभूळवाडी, धुमाळवाडी, रेठरे धरण, मरळनाथपूर येथे पाणी सोडण्यात आले असून लवकरच पाणी शिवपुरी येथे पोहचेल. .वाकुर्डे बुद्रुक योजना ४ जानेवारी रोजी सुरू करून वारणा कालव्याचे पाणी खिरवडे येथील पंपगृह सुरू करून ते हत्तेगाव तलावात सोडण्यात आले. त्या नंतर हत्तेगाव येथील तलाव भरल्यानंतर ते पाणी हत्तेगाव येथील पंपगृह सुरू करून करमजाई तलावात सोडल्याने करमजाई तलाव भरून ते पाणी मानकरवाडी येथील वितरण कुंडात आले आहे..Agriculture Irrigation: ‘सूर्या’ची बळीराजावर कृपा.वाळवा तालुक्यातील तलावांच्या पाणीसाठ्यात घट होऊ लागल्याने रब्बी पिकांसाठी पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे तलावांत पाणी सोडण्याची मागणी आमदार सत्यजित देशमुख व ग्रामस्थांनी केली होती. त्या नुसार वाकुर्डे योजनेचे पाणी सोडण्यात आले..मानकरवाडी येथे बुधवारी (ता. १४) पाणी आले असून ते पुढे शिवपुरी, वाघवाडी, जांभूळवाडी, धुमाळवाडी, रेठरे धरण, मरळनाथपूर येथे सोडले जाणार आहे. त्यानंतर सुरूल शाखेतून रेठरे धरण, ओझर्डे, सुरूल येथे सोडण्यात येणार आहे. .Agriculture Irrigation: वाकुर्डे, टेंभूचे रब्बीसाठी आवर्तन सुरू करण्याची मागणी.त्यानंतर कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, वशी, लाडेगाव, जाक्राईवाडी, ऐतवडे बुद्रुक, ढगेवाडी, कार्वे, कापरी, शेखरवाडी, रेड येथे सोडण्यात येणार आहे. अंतिम टप्प्यात मानकरवाडी ते रेड दरम्यान असणारे पाझर तलाव भरून घेतले जाणार आहेत..मानकरवाडीपासून पुढे वाळवा तालुक्यातील पूर्व भागातील गावांना पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी सहकार्य करावे. कोणीही मध्येच व्हॉल्व्ह उघडून पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.- प्रकाश बंडगर, उपविभागीय अभियंता, वारणावती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.