Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या दळणवळणासाठी राज्य शासनाने ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजने’अंतर्गत जिल्ह्यासाठी १७६ किमी पाणंद रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. नियोजन विभागाने ७ जानेवारीला या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय काढला आहे. यामुळे जिल्ह्यातील तब्बल १७७ गावांतील शिवार रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. .शेतीमाल वाहतुकीसाठी आजपर्यंत शेतकऱ्यांना कच्च्या, चिखलमय रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात ऊस, भाजीपाला, दूध व इतर शेतीमाल बाजारात पोहोचवणे कठीण होत होते..Farm Roads: जालना प्रशासनाने वर्षभरात केले २७५ किमीचे पाणंद रस्ते मोकळे.या योजनेमुळे शेतातून थेट मुख्य रस्त्यापर्यंत सुलभ व सुरक्षित दळणवळण उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचणार आहे..Farm Roads: पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी प्रस्ताव सादर करावेत: जिल्हाधिकारी गुप्ता.या अटींचे पालन बंधनकारकपाणंद मंजूर रस्ते अधिकृत गाव नकाशात असणे अनिवार्य आहे. रस्ता नकाशात नसल्यास, संबंधित जमीनधारकांची लेखी संमती घेणे बंधनकारक राहील. योजनेसाठी कोणतेही नवीन भूसंपादन केले जाणार नाही. .खासगी जमिनीवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता यंत्रणांना घ्यावी लागेल. (मनरेगा) आणि राज्य शासनाच्या रोहयो निधीच्या अभिसरणातून राबवली जाणार आहे. अकुशल कामांसाठी मनरेगाचा, खडीकरण व मुरमीकरणासाठी राज्य शासनाचा निधी वापरण्यात येणार आहे. ३१ मार्चपूर्वी कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, निधी मंजूर होताच प्रत्यक्षात या कामांना वेग मिळणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.