Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यात १९६ उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद

Maharashtra Election 2024 : काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांमुळे अनेक प्रकार समोर आले. तर ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
Maharashtra Election 2024
Maharashtra Election 2024Agrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यात १५ विधानसभा मतदार संघांमध्ये १९६ उमेदवार रिंगणात आहेत. महायुती व महाविकास आघाडीत प्रमुख लढत होत असली तरी अनेक ठिकाणी प्रहार मनसे व अपक्ष उमेदवारांनी चुरस वाढवली.

काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांमुळे अनेक प्रकार समोर आले. तर ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.११ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामध्ये सर्वाधिक मतदान दिंडोरी तालूक्यात ७१.९७ तर सर्वात कमी नाशिक पूर्व मतदार संघात ४९.६ टक्के होते.

जिल्ह्यात अत्यंत चुरशीच्या व काही मतदार संघांत अटी-तटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघांत मतदान पार पडले. एकूण ५० लाख ६१ हजार १८५ मतदार आहेत. त्यापैकी जिल्ह्यात मागील पाच वर्षांत पाच लाख मतदार वाढले आहेत.

येवला मतदार संघात मंत्री छगन भुजबळ, मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे, दिंडोरी येथे नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, दिलीप बोरसे, नितीन पवार, हिरामण खोसकर, सुहास कांदे यांच्यासमोर विरोधकांनी आव्हान निर्माण केल्याची परिस्थिती दिसून आली. त्यामुळे अनेक ठिकाणी मते पदरात पडून घेण्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते साम-दाम-दंड-भेद असे सर्वच पर्याय वापरत असल्याचे दिसून आले.

Maharashtra Election 2024
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात चुरशीने मतदान

सकाळी ७ पासून मतदानास सुरुवात झाली. मात्र मतदानाचा वेग संथ दिसून आला. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी शासकीय पातळीवर विविध उपक्रम घेण्यात आले. ते राजकीय पक्षांनीही निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने घरोघरी जाऊन मतदारांना मतदानासाठी आवाहन केले होते. महायुती व माहविकास आघाडी यांच्यात लढत दिसून आली. कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी व बहुरंगी लढती झाल्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस पहावयास मिळाली.

जिल्ह्यात १५ विधानसभा मतदार संघांत एकूण ४,९२२ मतदान केंद्रांपैकी ३,२८० मतदान केंद्रांवर बेव कास्टिंग कक्ष कार्यान्वित होते. सकाळी ७ पासून मतदान प्रक्रिया सुरू असून जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात स्थापित वेब कास्टिंग कक्षाद्वारे जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघांतील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे २० निरीक्षकांकडून काटेकोर निरीक्षण सुरू होते.

नांदगाव मतदार संघातील घटनांप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही

नांदगाव विधानसभा मतदार संघात मतदानाच्या वेळेस दिवसभर घडलेल्या घटनांप्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. याबाबत ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून होते, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

Maharashtra Election 2024
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात चुरशीने मतदान

नांदगाव शहरात गुरुकृपा महाविद्यालयाजवळ सकाळी काही मतदारांची एकाच ठिकाणी गर्दी झाली होती. यावरून उमेदवारांमध्ये झालेल्या शा‍ब्दिक चकमकीप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येत आहे. तसेच बाहेरील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. तसच साकोरे गावात घडलेल्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येत आहे. या वेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिस बळाचा सौम्य वापर करण्यात आला. त्यानंतर मतदार संघात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली.

प्रमुख घडामोडी

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत मात्र मतदानाची गती संथ

नाशिकमध्ये आणि नांदगाव मतदार संघात संवेदनशील केंद्रांवर सशस्त्र दलाचा बंदोबस्त

नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे व उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ भिडले

मोबाइल मतदान केंद्रात नेण्यावरून पोलिस व मतदारांमध्ये शाब्दिक चकमक

येवला तालुक्यात खरवंडी मतदान केंद्रावर छगन भुजबळ यांना रोखले, भुजबळ व स्थानिक ग्रामस्थांमध्ये वाद

काही केंद्रांवर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com