Dharashiv News: कर्नाटक सीमावर्ती भागातील महत्त्वाचा सण असलेली वेळ अमावास्या शुक्रवारी (ता. १९) जेवळी (ता. लोहारा) व परिसरात पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून, डोलणाऱ्या रब्बी पिकांच्या साक्षीने शेतकरी कुटुंबांनी वनभोजनाचा आनंद लुटला. या वेळी शिवार गजबजून गेल्याने या सणाचा उत्साह द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले..मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्या ही या भागात वेळा अमावास्या म्हणून साजरी करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. या सणाचे महत्त्व इतके मोठे आहे, की शुक्रवारी गावात जणू अघोषित संचारबंदी असल्यासारखी शांतता होती, तर दुसरीकडे शिवारात मोठी लगबग पाहायला मिळाली. सणानिमित्त गुरुवारी (ता. १८) रात्रीच घरोघरी स्वयंपाकाची तयारी करण्यात आली होती..Vela Amavasya: वेळा अमावास्येनिमित्त शेतशिवार फुलले .पारंपरिक रीतीने पूजन शुक्रवारी सकाळपासून शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर व खासगी वाहनांनी कुटुंबासह शेताकडे रवाना झाले. घरातील वडीलधारी मंडळी डोक्यावर अंबिलाचे गाडगे घेऊन पायी चालत शेतात पोहोचली. शिवारात पाच पांडव, लक्ष्मी आणि इतर देवदेवतांची विधिवत पूजा करण्यात आली. .Somawati Amavasya : देवा तुझी सोन्याची जेजुरी ; सोमवतीनिमित्त उसळला भाविकांचा जनसागर .पिकांमध्ये अंबिल आणि उंडे शिंपडून धरतीमातेची ओटी भरण्यात आली. पूजेनंतर शेतातच नातेवाईक आणि मित्रपरिवारासह वनभोजनाचा बेत रंगला. वनभोजनानंतर सायंकाळी कडब्याच्या पेटत्या पेंड्या हातात घेऊन ‘हेंडगा’ घेत शेताला प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी ‘हर-हर महादेव’, ‘बळीराजाचा चांगभलं’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सायंकाळी सजवलेली लक्ष्मीची प्रतिमा वाजत-गाजत घराकडे नेण्यात आली..उत्तम पावसामुळे यंदा आनंद अधिकयावर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने विहिरींना पाणी असून रब्बीची पिके जोमात आहेत. निसर्गाच्या या कृपाशीर्वादामुळे यंदाची वेळ अमावास्या खऱ्या अर्थानेआनंदाची ठरली, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.