Khaleda Zia Death: बांगलादेशमध्ये एका अध्यायाची समाप्ती
Bangladesh Politics: बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे राजधानी ढाका येथे नुकतेच निधन झाले. बांगलादेशचे राजकारण मागील चार दशकांपासून खालिदा झिया आणि शेख हसीना यांच्यातच फिरत राहिलेय. बांगलादेश अराजकाच्या एका विचित्र वळणावर पोहोचलेला असताना या दोघींपैकी एकीला जीव वाचविण्यासाठी देश सोडून पळून जावे लागलेय तर एकीचा मृत्यू झालाय, हा न्याय अजबच म्हणावा लागेल.