Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्याचा दुष्काळ इतिहास जमा करणार, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात स्मृतिस्तंभाजवळ बुधवारी (ता. १७) आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छापर संदेशात त्यांनी हा पुनरुच्चार केला. .हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त श्री. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी पालकमंत्री संजय शिरसाट, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मुख्यमंत्री यांच्या हस्ते स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हैदराबाद मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली..Beed Ahilyanagar Railway: ४० वर्षांची प्रतीक्षा संपली; बीड–अहिल्यानगर रेल्वे अखेर सुरू; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन.शुभेच्छा संदेशानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिकांसह निमंत्रितांची भेट घेतली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘केवळ हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचाच नव्हे तर हा एकसंध भारत निर्मितीचा दिवस आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अलीकडे मराठवाड्यात नैसर्गिक आपत्ती ओढवली. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे, पिकांचे नुकसान झाले..या आपत्तीत काही जणांचे प्राणही गेले. नुकसान झालेल्या सर्वांना तसेच नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत दिली जाईल. नैसर्गिक आपत्तीबरोबरच दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पुजला आहे. तो हटविण्यासाठी कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यापर्यंत आणले. दुसऱ्या टप्प्यात सांगली, कोल्हापुरातील पुराचे पाणी उजनीपर्यंत मराठवाड्यात आणले जाईल.’’.CM Devendra Fadnavis: तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करा: मुख्यमंत्री.काहींना शंका... पण काम करत राहूमुख्यमंत्री म्हणाले, ‘‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त १६ सप्टेंबर २०२३ ला मराठवाड्यात बैठक घेतली. त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचे काय झाले, याविषयी काहींना शंका आहे. त्या वेळी झालेल्या निर्णयाचे काय झाले, याविषयी सांगत बसलो तर वेळ लागेल. परंतु काही कामांचा उल्लेख करावाच लागेल, असे म्हणत श्री. फडणवीस यांनी, घृष्णेश्वर, तुळजापूर, औंढा-नागनाथ विकास आराखडा, मानव विकास मिशनअंतर्गत दिलेल्या ९४ बस, छत्रपती संभाजीनगर शहरासाठी दिलेल्या ११५ बस, ९१६ अंगणवाड्या, .२६ हजार ५०० बचत गट तयार करून त्या माध्यमातून २ लाख ७० हजार महिला जोडणे, ३१२१ कोटींच्या रस्त्यांची सुरू केलेली कामे, ४ लाख पैकी ३० हजार सिंचन विहिरींची केलेली निर्मित आदींची मांडणी केली. छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रिक वाहनांची राजधानी बनते आहे. त्यामुळे झालेली बैठक आणि त्यातील निर्णय औपचारिकता नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले. कुणाला शंका असल्या तरी महायुती सरकार मराठवाड्याच्या प्रगतीसाठी काम करीत राहील, असेही ते म्हणाले..बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेचे उद्घाटनबीड : बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या रेल्वे प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा बुधवारी (ता. १७) हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी पूर्ण झाला. तब्बल चाळीस वर्षांपासून वाट पाहिलेल्या बीडकरांच्या बीड ते अहिल्यानगर या प्रवासी रेल्वेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले..पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, राज्यसभा सदस्य रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा, आमदार विक्रम काळे, आमदार विजयसिंह पंडित, रेल्वेचे श्री. मिना, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.