Nagpur News : शक्तिपीठ नागपूर-रत्नागिरी महामार्गाला समांतर असल्याचे निदर्शनास आल्यामुळे करण्यात आलेले आरेखन सोलापूरपासून बदलण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधून हा महामार्ग जाईल. तसेच या महिन्यातच काम सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत रविवारी (ता. १४) केली. .अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना शक्तिपीठ महामार्ग हा मराठवाड्यासाठी गेमचेंजर प्रकल्प असेल, असे सांगत या महामार्गासाठी आरेखनात बदल केला असून सोलापुरातून सांगली आणि पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधून पत्रादेवीला जाईल, अशी घोषणा श्री. फडणवीस यांनी केली..ते म्हणाले, ‘‘शक्तिपीठ महामार्गाचा मराठवाड्याला फायदा होईल. मराठवाड्याचे चित्र बदलेल. हा प्रस्तावित महामार्ग सोलापूरपासून नागपूर-रत्नागिरी या महामार्गाला समांतर असल्याचा आक्षेप होता. त्यामुळे तेथून आरेखन बदलले आहे. हा ग्रीनफिल्ड महामार्ग असल्याने अनेक न जोडलेले मार्ग येणे अपेक्षित आहे..Shaktipeeth Expressway: 'शक्तिपीठ'चा मार्ग बदलला, सोलापूर, सांगली, चंदगड...मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली सविस्तर माहिती.त्यामुळे सोलापूरपासून नवीन आरेखन तयार केले असून सांगलीतून पुढे चंदगडमार्गे हा महामार्ग जाईल.’’ चंदगड येथून मोर्चा काढून शेतकऱ्यांनी महामार्ग न्या, अशी मागणी केली होती. आता जेथून आरेखन बदलले आहे, तेथील लोकही आमच्याकडे महामार्ग करा, असे सांगत आहेत. हे आरेखन विरोधामुळे नव्हे तर सोईसाठी बदलण्यात आल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले..‘दुष्काळी भागाचे चित्र बदलेल’या महामार्गाने दुष्काळी भागाचे चित्र बदलेल, असे सांगत श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘नवीन आरेखनातून वनजमीन वगळलली आहे. या महामार्गाने देवस्थानांना जोडता येईलच शिवाय दुष्काळी भागाचे चित्र बदलण्याचे काम होईल.’’.काम पुढील वर्षातच सुरूया महामार्गाचे काम पुढील वर्षातच सुरू होईल, असेही श्री. फडणवीस म्हणाले. ‘‘शक्तिपीठ महामार्गाचे काम २०२६ मध्ये सुरू होईल. या मार्गामुळे १८ तासांचा प्रवास ८ तासांवर येईल. ३२ जिल्ह्यांना यामुळे कनेक्टिव्हिटी होईल. हा गेमचेंजर प्रकल्प आहे.’’.‘कापूस खरेदी मर्यादा वाढविली’राज्यात कापूस करेदीबाबात प्रश्न निर्माण झाला. मात्र ही मर्यादा वाढवल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले. ते म्हणाले, ‘‘सीसीआयने पहिल्यांदा उतपादकतेवर आधारित खरेदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सरासरी १२ क्विंटल आल्याने नुकासन होत होते. त्यामुळे उत्पादकता पकडताना पहिल्या तीन जिल्ह्यांची उत्पादकता पकडून उत्पादकता ठरवावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. त्यामुळे हेक्टरी १२७७ ऐवजी २३३८ क्लिंटल केली आहे..Shaktipeeth Expressway: ''मोठ्या कंपन्यांना टेंडर देण्यासाठी...'' 'शक्तिपीठ'वरून राजू शेट्टी आक्रमक, मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप.सूप वाजलेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पार्श्वभूमी असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप रविवारी दुपारी अडीच वाजता कोणत्याही ठोस आश्वासन आणि निणर्याविना वाजले. अर्थसंकल्पी अधिवेशन २३ फेब्रुवारी रोजी सुरू होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. ७५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडून मान्य करण्यापलिकडे या अधिवेशनाचे फलित नाही, अशी टीका सत्ताधारी आणि विरोधकही करत आहेत..१६ विधेयके संमतहिवाळी अधिवेशनात १८ शासकीय विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी १६ संमत करण्यात आली. तर विधान परिषदेत चार विधेयके संमत झाली. २१ अशासकीय विधेयकांच्या सूचना मांडण्यात आल्या. त्यापैकी आठ मान्य केल्या. तर आठ अशासकीय विधेयके पुनर्स्थापित करण्यात आली. १८३७ लक्षवेधी सूचनांपैकी २९९ मान्य करण्यात आल्या त्यापैकी ७० चर्चेला आल्या. तर ७२८६ तारांकित प्रश्न आले होते. त्यापैकी २१५ स्वीकृत झाले तर २७ प्रश्नांवर चर्चा झाली..‘कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे’एक जुलैपर्यंत कर्जमाफी करू, या आश्वासनाचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘कर्जमाफीबाबत सरकारने शब्द दिला आहे. अतिवृष्टीचा ताण आल्याने बजेट अडचणीत आहे. असे असले तरी कर्जमाफी द्यायची आहे. कोणत्याही परिस्थितीत बँकांना फायदा होऊ नये, तो शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी समिती नेमली आहे. २०१७ आणि २० मध्ये कर्जमाफी केली. तरीही आज कर्जमाफीची मागणी होत आहे. कुठेतरी नियोजनात अडचण आहे याचे हे निदर्शक आहे. त्यामुळे उपयायोजनांचा भाग म्हणून कर्जमाफी असेल.’’.शक्तिपीठ महामार्गाचे टेंडर देण्याच्या अटीवर बड्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांकडून निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा व जनतेचा विरोध असूनही दररोज एक मार्ग बदलून शक्तिपीठ महामार्ग रेटण्याचा अटापिटा देवेंद्र फडणवीस करत आहेत.राजू शेट्टी, माजी खासदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.