Nanded News : राहायला घर राहिलं नाही आता कुठं राहावं. अशा दुःखाच्या वेळी आमचं माय बाप सरकार होयायला पाहिजं होतं, पण या सरकारने आमचं घात करून पोलिसाच्या बंदुकीची धमकी दाखवत धरण कोडलंय. आता आम्ही कसं जगाव कोणाकडं न्याय मागाव. आमचं वाली आता कोणी उरला नाही. धरण सरकाचं झालं पण मरण आमच्या लेकरा- बाळाचं झालं... अशा दुःखात आमच्या गरिबांच्या लेकरा-बाळाचं कोणी ऐकून घेऊन आमची मदत करल का...? असा आर्त टाहो लेंडी प्रकल्पग्रस्त फोडत आहेत..सोमवारी (ता. १८) जवळून मृत्यू पाहिलेल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांनी व्यथा मांडल्या आहेत. मुला, मुलींच्या शिक्षण लग्नासाठी जिंदगीभर दिवस-रातर काम करून चार लाख रुपये कमावले होतो. लेकीच्या लग्नाला सनगं होतील म्हणून गुंज, गुंज घेत दोन तोळे सोनं आणि ६० तोळे चांदी जमा होतो. पण नदीला पूर आला आणि जिंदगीभर केलेलं सगळंच वाहून गेलं. आता लेकरा बाळाचं लग्न, शिक्षणही त्यासोबत वाहून गेलं आता आम्ही जगूनबी मेल्यासारखंच आहे, असं शेषाबाई सोनकांबळे सांगताना रडू कोसळत होत. आम्ही दोन बहीण आणि एक भाऊ आहे. .माझे, माय-बाप दिवस रात्र मोलमजुरी करून आम्हांला शिक्षण देण्यासाठी धडपडत आहेत. आमच्या शिक्षणाची फिस भरण्यासाठी घरात एक लाख रुपये ठेवले होते. ते, नगदी रुपये व संसार उपयोगी साहित्य सर्व वाहून गेले. आमचा जीव वाचला आता आमचे शिक्षण कसे होणार? साराकार तर नियमबाह्य कामे करून धरण कोडले मग आमचा वाली कोण होणार, असा प्रश्न पूजा बापूराव सोनकांबळे या प्रकल्पग्रस्त मुलीने केला आहे. मोलमजुरी करत घर आणि लेकराचं शिक्षण करत होते. सगळं सुखानं चालू होतं..Rain Crop Damage : पिके पिवळी पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.पण सरकारनं धरण कोडलं त्यात आमचं सगळंच गेलं हे, सरकार वैरी हाय, अशी प्रतिक्रिया बिबी खाजा मियां यांनी दिली आहे. मला रहायला घर नाही. शेत नाही. पोटाला चार पोरी लग्नाच्या हाईत मझ्या लेकराचं चांगलं होवाव, म्हणून आयुष्यभर काम करून दहा तोळं सोनं, पन्नास तोळं चांदी व ५ लाख रुपये जमा करून डब्यात ठेवलो होतो. पण नदीच्या लाटीत सगळंच वाहून गेलं. आम्ही कसं तर वाचून बाहीर आलो आता मझ्या लेकराचं कसं होईल, असा हंबरडा हरीबा धोडींबा फिगरवाड यांनी फोडला आहे. .नदीचं पाणी वाढत असल्यानं पत्नीला घेऊन घरा बाहेर पडत असताना एका सेकंदामध्ये मोठी लाट आली. आणि आम्हाला वाहून नेले. एका झाडाला पकडले पण लाटा मोठ्या होत्या. साडी झाडाला बांधून रातर काढली. दुसऱ्या दिवशी बारा वाजता आम्हाला वाचविले. मरण काय राहतंय हे, जवळून बघितलो. सरकार आमचा वैरी झाले असे शादुल अल्लाबकस शेख यांनी बोलून दाखवले. घरातून बाहीर येत असताना पाणी घराच्यावर गेले. अंधारात आम्हाला काही समजले नाही. मरण समोर दिसत होते. .लाटा तोंडावर आपटत होत्या. नशिबानं आम्ही सगळे वाचलो, अशी कैफियत कौशिक अहेमद शेख यांनी मांडली. मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपये, दोन तोळे सोनं, चांदी, किराणा इतर साहित्य आणून ठेवलो होतो. या पुरात सगळंच वाहून गेलं. आता मझ्या लेकराचं लग्न शिक्षण कसं होईल. आमचा वाली कोणीबी नाही, अशी चिंता गंगाधर थोटवे यांना लागली आहे. नातीच्या लग्नासाठी दोन तोळे सोनं, ६० तोळे चांदीचे वाळे, दंडकडे जमा करून ठेवलो होतो. .Rain Crop Damage: सांगली जिल्ह्यातील सात हजार एकरांवरील पिके पाण्यात.पण यापुरात सगळंच गेलं आता मझ्या नातीचं लगन शिक्षण कसं आणि कोण करेल, असा सवाल अनुसया पांचाळ यांनी केला आहे. नियमात नसतानाही निव्वळ राजकीय फायद्यासाठी धरणाची गळभरणी करण्यात आली. त्यात आम्हांला सर्वस्व गमावून बसण्याची वेळ आली. गळभणी केल्यामुळेच हे, सगळं अघटित घडलंय निष्पाप लोकांचा बळी गेला. प्रशासनातील अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे जैनुद्दीन पटेल म्हणले..बाधिताच्या प्रमुख मागण्या... गुनाहगार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तत्काळ नुकसानभरपाई, पुनर्वसन आणि शिक्षण/लग्नासाठी आर्थिक मदत द्यावी. गळभरणीचा तपास होऊन जबाबदारांवर कारवाई व्हावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.