Dharashiv News: धारशिव ‘‘जिल्ह्यात विशेषतः परंडा व भूम तालुक्यांत नद्यांना आलेल्या पुरामुळे जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, जमीन खरडून गेल्यानंतर हेक्टरी केवळ ४७ हजार रुपये भरपाई देण्यात येते. भरपाईचे हे निकष बदलण्यात येणार असून शेतकऱ्यांना त्याबदल्यात चांगली भरपाई देण्यात येईल,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. २४) यांनी दिली. .परंडा तालुक्यातील पूरग्रस्त करंजा गावाच्या शिंदेवस्ती आणि करळेवस्तीला श्री. शिंदे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधला..Crop Damage: मंत्र्यांनी नौटंकी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी; किसान सभेची मागणी.पालकमंत्री प्रताप सरनाईक व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत, जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक रितू खोखर, सहायक जिल्हाधिकारी तथा भूम उपविभागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे व तहसीलदार नीलेश काकडे उपस्थित होते. करंजा गावाजवळील शिंदे वस्तीतील चांगदेव शिंदे यांच्या पूरबाधित घराची पाहणी केली. वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी शिंदे यांचेकडे बाधित वस्तीतील लोकांनी केल्यानंतर नक्कीच पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले..‘‘बाधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना तात्पुरती मदत लवकरच करण्यात येईल. तसेच पंचनामे करून मदत देण्यात येईल. अटी व निकष थोडे बाजूला ठेवून चांगली मदत देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. यामध्ये कोणी कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही. जमीन पूर्णपणे खरडून गेली असून शेत जमिनीच्या नुकसानीबाबत भरपाईचे निकष बदलण्यात येतील,’’ असेही श्री. शिंदे यांनी सांगितले..Ajit Pawar: सोलापूरमधील पूरग्रस्त भागात अजित पवारांचा पाहणी दौरा; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचं आश्वासन.बाधितांना आता मदतीची आवश्यकता असून प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करावी. नैसर्गिक आपत्ती कोसळली असून अशा प्रकारच्या संकटांना न घाबरता धीर धरावा. सरकार म्हणून आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. केंद्र आणि राज्य सरकारची मदत देऊन जनतेला आधार देण्यात येईल..पंचनाम्यानंतर नुकसानीची तीव्रता समोर आल्यानंतर भरपाईसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल,’’ असे श्री. शिंदे यांनी सांगितले. जवळच्या करळेवस्तीला एनडीआरएफच्या बोटीने जाऊन भेट दिली व बाधित वस्तीतील लोकांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली. त्यांना धीर देऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.