New Delhi News: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी होत आहे, सोमवारीदेखील (ता. ९) सभागृहात गदारोळ सुरू झाला. लोकसभेतील काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलू न दिल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. .काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षाला बोलण्याचा अधिकार नाकारणे हे अत्यंत चुकीचे असल्याचेही थरूर यांनी म्हटले आहे. ‘७० वर्षांमध्ये पहिल्यांदाच असे घडत आहे की विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची संधी नाकारली जाते. जर विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची संधी नाकारल्यास लोकशाहीचा उद्देशच नष्ट होतो, असेही ते म्हणाले..Parliament Budget Session: लोकशाहीसाठी धोक्याची घंटा.लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार?विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लोकसभेत बोलू दिले जात नसल्याचा मुद्दा काँग्रेसकडून सातत्याने संसदेत उचलून धरला जात आहे. अशातच एकामागोमाग एक घडलेल्या काही घटनांनी विरोधी पक्ष लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत..अध्यक्ष बिर्ला यांच्यावर एकतर्फी कामकाज चालविल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात असून आता त्यांच्याविरोधात थेट अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांनी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. केवळ काँग्रेसच नव्हे तर विरोधी बाकांवरील सर्वच पक्ष एकजुटीने प्रस्तावाच्या बाजूने उभे राहणार असल्याचे सांगितले जात आहे..Parliament Budget Session 2026: लोकसभेतील काँग्रेसचे आठ खासदार निलंबित; राहुल गांधीना बोलू न देण्यावरून गदारोळ.अविश्वाव प्रस्तावासाठी लोकसभेच्या महासचिवांना लवकरच नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्षात अविश्वास प्रस्ताव लोकसभेत येऊ शकतो. विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव आणल्यास सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या बिर्ला यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित राहणार आहेत. या प्रस्तावाला समाजवादी पक्ष आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) यांचा पाठिंबा आहे, तर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) ने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही..महिला खासदारांचे अध्यक्षांना पत्रकाँग्रेसच्या महिला सांसदांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहले असून, तुम्ही सतत सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करीत आहात, असाही आरोपही या पत्रात केला आहे. महिला खासदारांवर अध्यक्ष बिर्ला यांनी केलेले आरोप निराधार, खोटे आणि बदनामीकारक आहेत. अध्यक्षांचे पद निष्पक्ष असावे, परंतु ते सध्या भाजपच्या दबावाखाली निर्णय घेत आहेत, असाही आरोप महिला खासदरांनी केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.