Kolhapur News: कोवाड परिसरातून वाहणाऱ्या ताम्रपर्णी नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नदीचे पाणी सध्या हिरवे पिवळसर दिसून येत आहे. हा बदल काही दिवसांपासून जाणवत आहे. नदीवर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्याच्या वापरावर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे..ताम्रपर्णी नदी ही कोवाड व परिसरातील अनेक गावांचा प्रमुख जलस्रोत आहे. दररोज नदीपात्रातून पाणी उचलून घरगुती वापर, शेती तसेच जनावरांसाठी वापरले जाते. मात्र, पाण्याच्या रंगात झालेल्या बदलामुळे पाणी वापरण्याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. काही ठिकाणी पाण्याला दुर्गंधी जाणवत असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे..Bhima River Pollution: शिरापूरला भीमा नदीतील जलपर्णीत वाढ.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नदीपात्रात साचलेले सांडपाणी, शेतीमधून वाहून येणारी रसायने किंवा नैसर्गिक घटकांमुळे पाण्याचा रंग बदलला असण्याची शक्यता आहे. मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी तातडीने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आरोग्य, जलसंपदा विभाग तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्वरित दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पाण्याची गुणवत्ता तपासून अहवाल जाहीर करावा आणि नागरिकांना सुरक्षित पाण्याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे..Chandrabhaga River Pollution: चंद्रभागा पात्रात मैलामिश्रित पाणी.दरम्यान, नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरीही चिंतेत आहेत. पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून ताम्रपर्णी नदीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी कोवाड परिसरातून होत आहे..ताम्रपणे नदीमध्ये अनेक दिवसांपासून पाणी साठलेले आहे. त्यामुळे कदाचित त्याचा रंग बदलला असेल. धरणातून नवीन पाणी सोडल्यानंतर साठलेले पाणी निघून जाईल अशी शक्यता वाटते.- डी. आर. धोंडफोडे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग चंदगड.नदीतील पाण्याचा रंग बदलला असून पाण्यावर शेवाळाचा रपटा दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून नवीन पाणी सोडण्याची गरज आहे.- लक्ष्मण मनवाडकर, कोवाड, ग्रामस्थ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.