Jalgaon News: लिंबूवर्गीय पिके काही वेळेस चांगला नफा देतात. काही वेळेस लिंबूमध्ये खर्चही निघत नाही. नफा नसल्यास खर्च करता येत नाही. यामुळे दर नियंत्रण, नियमन यावरही काम व्हायला हवे. शास्त्रज्ञ, शेतकरी व उद्योजक यांची एक भक्कम ताकद, फळी तयार होऊन त्यांची आपापसांत भागीदारी झाल्यास लिंबूवर्गीय पिकांत चांगले काम करता येईल, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला..जैन हिल्स येथे आयोजित लिंबूवर्गीय फळपीक परिषदेत मंगळवारी (ता. २३) विविध कृषी संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञ, उद्योजक व शेतकरी यांची एकत्र बैठक घेण्यात आली. त्यात लिंबूवर्गीय क्षेत्रासाठी काय करता येईल, शेतकऱ्यांना रोगमुक्त रोपे कशी मिळतील आदी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली..Citrus Crop Productivity: गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी रोगमुक्त रोपे, चाचण्या आवश्यक.या बैठकीत डॉ. अनिल ढाके, डॉ. एम. एस. लडानिया, डॉ. बालकृष्ण यांच्यासह अन्य तज्ज्ञ, उद्योजक उपस्थित होते. त्यात लिंबूवर्गीय पिकांत ड्रोनचा उपयोग व नवतंत्राबाबत इस्राईलमधील तज्ज्ञ अवी सदका, डॉ. एन. के. कृष्णकुमार आदींनी मार्गदर्शन केले. या चर्चेत हरियाना, पंजाब, हिमाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा, तेलंगणा, महाराष्ट्र आदी भागांतील शेतकरी सहभागी झाले. अन्य शास्त्रज्ञांनी देखील आपापली मते मांडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले..Citrus Farming Innovation: लिंबूवर्गीय पिकांत मूल्यवर्धन हवे.मूल्यवर्धन महत्त्वाचेलिंबूवर्गीय पिकांत मूल्यवर्धन महत्त्वाचे आहे. या फळांत विविध दर्जा, आकाराची फळे येतात. त्यांची प्रतवारी व अन्य मुद्दे सतत येत असतात. पण मूल्यवर्धनात फळांचा आकार हा मुद्दा नसतो. मूल्यवर्धन झाल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल, असे तेलंगणा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सांगितले..रोगराईबाबत ऊहापोहरोगराई नियंत्रणासाठी क्रॉप कव्हर, प्रकाश सापळे, ड्रोन आदी तंत्र आवश्यक आहे. त्याचा चांगला उपयोग होईल. पण त्यासाठी काही कार्यक्रम शासनाने ठरवून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. यातून रोगराईसंबंधी धडक कार्यक्रम राबविणे शक्य होईल. सर्वस्तरावर रोगराईसंबंधी काम होईल व समस्या समूळ दूर करणे सोपे जाईल. काही भागात विद्यापीठे, शासन स्तरावर दोन-तीन वर्षांसाठी रोगराई नियंत्रण उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यांचे प्रतिमान अन्यत्र लागू केले जावे, अशी मागणी करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.