Pune News: राज्याच्या साखर आयुक्तालयातील दोन सहायक संचालकांसह एकूण ५० पदे रिक्त आहेत. यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यातील २०० पेक्षा जास्त साखर कारखान्यांवर कायदेशीर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी साखर आयुक्तालयाकडे आहे. त्यासाठी आयुक्तालयात १०२, तर प्रादेशिक सहसंचालकांच्या कार्यालयांकरिता ७६ पदे मंजूर करण्यात आलेली आहे. .परंतु, आयुक्तालयातील ५०, तर प्रादेशिक पातळीवरील ३१ पदे रिक्त आहेत. साखर नियंत्रण आदेश, अत्यावश्यक वस्तू कायदा, तसेच महाराष्ट्र (साखर कारखान्यांना पुरविण्यात आलेल्या) ऊस दराचे विनियमन कायदा २०१३, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९० प्रमाणे सहकारी व खासगी कारखान्यांकडून कामकाज होते की नाही, हे पाहण्याची, तसेच शेतकऱ्यांना नियमानुसार रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) मिळवून देण्याची जबाबदारीदेखील आयुक्तालयाकडे आहे..Sugar Industry Loan: आधी अहवाल द्या; नंतरच कर्ज घ्या!.‘‘मुख्यालय व प्रादेशिक स्तरावर पुरेसे मनुष्यबळ नसल्यास प्रशासकीय, तसेच कायदेशीर जबाबदारी वेळेत पार पाडण्यात अडथळे येतात. त्यातून काही बाबी रेंगाळतात,’’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले..प्रादेशिक पातळीवरील ७६ पैकी १४ पदे सध्या स्थायी, तर ६२ पदे अस्थायी असून एकूण ४५ पदे भरलेली आहेत. विशेष म्हणजे, प्रादेशिक सहसंचालकांना मदतीसाठी शासनाने ८ उपसंचालक व ६ कृषी अधिकारी मंजूर केले आहेत. यातील सध्या तीन ठिकाणी उपसंचालकच उपलब्ध नाहीत. याशिवाय एक कृषी अधिकारी, एक सहायक अधिकारी व सात लिपिक पदांच्या जागा रिक्त आहेत. मुख्यालयातदेखील २ सहायक साखर संचालक, ११ वरिष्ठ, तर १४ कनिष्ठ लिपिकांच्या जागा भरलेल्या नाहीत..Sugar Price Fall: दरातील घसरणीमुळे साखर उद्योगात चिंता.एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, साखर आयुक्तालयातील सध्याच्या रिक्त जागा हे आमचे मूळ दुखणे नाही. जागा रिक्त असूनही इतर अधिकारी व कर्मचारी कसबसे काम रेटून नेत आहेत. आमची मूळ समस्या आयुक्त पदाची आहे. शेखर गायकवाड यांच्यानंतर राज्य शासनाने एकही स्थिर आयुक्त दिलेला नाही. येणारा आयुक्त एक तर बदलून जातो किंवा निवृत्त होतो..कामकाज समजण्यात जातात अनेक महिनेआतापर्यंत तीन साखर आयुक्त पदाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बदलून गेले आहेत. प्रत्येक नव्या आयुक्ताचे काही महिने केवळ आयुक्तालयाचे कामकाज उमगण्यात आणि साखर उद्योगाला जाणून घेण्यात जातात. त्यामुळे साखर आयुक्तालय प्रशासकीयदृष्ट्या कायम डळमळीत राहिलेले आहे, असे एका प्रादेशिक सहसंचालकाने स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.