Chandrapur News: गोसेखुर्द धरणाचा कालवा गावालगत जात असल्याने मिंथूर आणि नवेगाव पांडव या जुळ्या गावांतील शेतकऱ्यांच्या मनात सिंचनाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात कालव्याचा काहीच लाभ न मिळाल्याने या गावांतील शेतकरी निराशेत आहेत. कालव्याच्या कामासाठी शेकडो हेक्टर जमीन संपादित झाली; पण ना योग्य मोबदला मिळाला, ना शेतापर्यंत पाणी पोहोचले. परिणामी, शेतकरी कर्जाच्या गर्तेत सापडले आहेत..मिंथूर व नवेगाव पांडव या गावांची एकत्रित लोकसंख्या सुमारे चार हजार आहे. गावालगत गोसेखुर्दचा कालवा वाहत असतानाही ही दोन्ही गावे आजही सिंचनापासून पूर्णतः वंचित आहेत. सन २००७-०८, तसेच २०१० पासून कालव्याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने संपादित केल्या. शेती हा उपजीविकेचा एकमेव आधार असताना जमीन गेल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले..Agriculture Irrigation Issues: पाणी परवान्यांसाठी शेतकऱ्यांची पायपीट.शेती गेली तरी किमान सिंचनाची सोय होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र कालवा पूर्णपणे बंदिस्त करण्यात आल्याने पाणी घेण्याची कोणतीही व्यवस्था उरलेली नाही. त्यामुळे ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले’ अशी अवस्था या शेतकऱ्यांची झाली आहे. ‘विकासाच्या नावाखाली जमीन घेतली, पण विकासाचा लाभ दिला नाही,’ असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. गोसेखुर्द कालव्याचे पाणी शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी मिंथूर–नवेगावच्या शेतकऱ्यांना आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार, असा संतप्त प्रश्न गावकऱ्यांनी केला आहे..Agriculture Irrigation Issue: मळदमधील पोटचाऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी.आंदोलनाचा इशाराया परिस्थितीबाबत बोलताना नागभीडचे शिवसेना तालुकाप्रमुख गिरीश नवघडे म्हणाले की, मिंथूर–नवेगाव परिसरातील शेकडो हेक्टर जमीन कालव्यासाठी घेतली; मात्र शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि सिंचन मिळाले नाही. आता तरी सरकारने या कालव्यातून पाणी देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल..“२००७-०८ मध्ये माझी १ हेक्टर २० आर जमीन कालव्यासाठी कमी दरात घेतली. जमिनीची खरी किंमत २० लाख रुपये असताना फक्त १ लाख ४८ हजार रुपये मोबदला मिळाला. जमीनही गेली आणि सिंचनही झाले नाही.”- गोपाल धर्मदास शिवणकर, रा. मिंथूर.“६० आर जमिनीचा तुटपुंजा मोबदला मिळाल्याने दुसरी जमीन घेता आली नाही. मिळालेल्या पैशाचा योग्य उपयोगही झाला नाही. आज शेती करूनही उत्पन्न होत नाही. हा आमच्यावर मोठा अन्याय आहे.”-श्रीधर नानाजी आलबनकर, रा. मिंथूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.