Jalgaon News: मोहिदे (ता. चोपडा) व होळनांथे (ता. शिरपूर) या दोन गावांना जोडणाऱ्या अनेर नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. या पुलाला संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेले कठडेच नाहीत. त्यामुळे लहानमोठे अपघात होऊन अनेक जण गंभीर जखमी झाले असून काहींचा तर मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत..या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळण्यासारखा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. .Aner River Bridge : अनेर नदीवरील पूल बनला धोकादायक.मोहिदे व होळनांथे या दोन गावांना जोडणारा हा पूल २००६ मध्ये मंजूर झाला होता. जवळपास परिसरातील २५ गावांशी संबंध येणाऱ्या या पुलाची सद्यःस्थितीत अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. कठडे नसलेल्या या पुलावर जागोजागी लहानमोठे खड्डे पडून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. .Surya River Bridge : जीवघेणा प्रवास संपता संपेना.या संदर्भात शेतकरी, ग्रामस्थांनी धुळे येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात दोन-तीन वेळा लेखी तक्रारी केल्या. वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही त्यांच्या तक्रारीची दखलच घेतली जात नसल्याचा अनुभव आला आहे..रात्री अपरात्री पुलावरून जाताना समोरील वाहनांच्या दिव्यांचा प्रकाश डोळ्यांवर आल्याने अनेक जण पुलावरून खाली व नदीत पडल्याच्या दहा ते बारा घटना घडल्या आहेत. यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत तर काही जण मृत्युमुखीदेखील पडले आहेत, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.