Dharashiva News: धाराशिव जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने तयारीला वेग आला आहे. जिल्हा परिषदेचे ५५ गट, तर आठ पंचायत समितींच्या ११० गणांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी गेल्या काही महिन्यांपासून जय्यत तयारी केली आहे. .धाराशिव जिल्हा परिषदेच्या यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ २० मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली नाही. २१ मार्च २०२२ पासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या पावणेचार वर्षांपासून विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेची निवडणूक केव्हा जाहीर होणार, याची उत्सुकता होती. यापैकी अनेकांनी निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी केली आहे..Local Body Elections: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘झेडपी’, पंचायत समिती निवडणूक जाहीर.नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील सर्वच पक्षांतील नेतेमंडळींनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५५ जागा आहेत. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने २६, काँग्रेसने १३, शिवसेनेने ११, भाजपने चार जागांवर विजय मिळविला होता तर एक अपक्षही निवडून आला होता..गेल्यावेळी सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या मदतीने सत्ता मिळविली होती. दरम्यान, गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून तर माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासमवेत त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील बहुतांश सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे..Local Body Elections: कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकांसाठी चुरशीने मतदान.इच्छुकांची भाऊगर्दी, उमेदवारीसाठी फिल्डिंगगेल्या पावणेचार वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक झालेली नाही. अनेकांनी तेव्हापासून निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट, गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांनी जोरदार तयारी केलेली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये यंदा इच्छुकांची संख्या मोठी आहे. उमेदवारीसाठी अनेकांनी आरक्षण जाहीर झाल्यापासून पक्षाच्या नेतेमंडळींकडे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, इच्छुकांची संख्या लक्षात घेता उमेदवारी मिळेल की नाही, याची शंका अनेकांना आहे. त्यातच महाविकास आघाडी किंवा महायुती झाली तर गट किंवा गण कोणत्या पक्षाकडे जाईल, याचीही धास्ती इच्छुकांना आहे..निर्णयासाठी आठवडाच, नेतेमंडळीचा कस लागणार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २१ जानेवारीपर्यंत आहे. त्यामुळे यासाठी अवघा एकच आठवड्याचा अवधी आहे. आठवडाभरातच उमेदवार निश्चित करताना प्रत्येक पक्षांच्या नेतेमंडळीचा कस लागणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींची आतापासूनच धावपळ होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.