Nashik News: कळवण तालुक्यातील रवळजी, मोकभणगी, देसराणे, खेडगाव, ककाणे यांसह परिसरात सध्या कांदा लागवडीला वेग आला आहे. दरवर्षी मजुरांच्या टंचाईमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी या वर्षी यंत्राद्वारे कांदा लागवडीला पसंती दिली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे..दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरमध्ये कांदा लागवड पूर्ण होते. मात्र यंदाच्या लागवडीवेळी मॉन्सूनोत्तर पावसामुळे पहिल्या टप्प्यातील रोपे खराब झाल्याने लागवड लांबणीवर पडली.दुसऱ्या टप्प्यातील रोपे आता तयार झाल्याने संपूर्ण तालुक्यात एकाच वेळी लागवडीची कामे सुरू झाली आहेत. .Onion Cultivation: अनिश्चित दर तरी कांदा जोमात.यामुळे मजुरांची मोठी टंचाई निर्माण झाली असून, वाढीव मजुरीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. या संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता ‘प्लँटर’ यंत्राचा पर्याय निवडला आहे..Onion Planting Machine: कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची यंत्राला पसंती.या पद्धतीत जमीन रोटावेटरने भुसभुशीत करून नंतर सपाट करणे आवश्यक असते. ट्रॅक्टरचलित यंत्रामध्ये रोपे ठेवण्यासाठी आणि ती लावण्यासाठी विशिष्ट रचना केलेली आहे. यात मजुरांच्या सहाय्याने यंत्रामध्ये रोपे टाकली जातात. यंत्राद्वारे ती जमिनीत ठराविक खोलीवर व योग्य अंतरावर रोवली जातात..यंत्राद्वारे कांदा लागवड केल्यास मजुरीचा मोठा खर्च वाचतो. एका एकरात सुमारे दोन ते अडीच लाख रोपे लागतात. अंतर योग्य राखले गेल्याने उत्पादनात निश्चितपणे वाढ होते. एकंदरीत ही पद्धत वेळेची आणि पैशांची बचत करणारी आहे.संतोष हिरे, कांदा उत्पादक शेतकरी, देसराणे.जमिनीच्या सर्व भागात यंत्राद्वारे सारखीच लागवड होते. स्वतंत्रपणे वाफे तयार करण्याची गरज पडत नाही. यामुळे कांद्याची प्रतवारी सुधारते आणि शेतकऱ्यांचा फायदा होतो.भगवान गोविंदा पवार, यंत्र मालक, मोकभणगी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.