Anil Daunde : प्रशासनाने वारकऱ्यांना सुविधा द्याव्यात

Wari Management : वारी सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी सुसंवाद ठेवत वारीचे नियोजन करून वारकऱ्यांना सेवा द्याव्यात,’’ असे आदेश खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी आळंदीत दिले.
Wari
WariAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘कार्तिकी वारीदरम्यान राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, सुरक्षाव्यवस्था, वीजपुरवठा आणि शहर स्वच्छतेच्या सुविधा चोवीस तास पुरविल्या जातील. वारी सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी सुसंवाद ठेवत वारीचे नियोजन करून वारकऱ्यांना सेवा द्याव्यात,’’ असे आदेश खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी आळंदीत दिले.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउली संजीवन समाधी सोहळा २३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत आळंदी शहरात पार पडणार असून, वारीच्या पूर्वतयारीची नियोजन बैठक दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृह येथे बुधवारी (ता. ६) पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विविध प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, डी. डी. भोसले, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, राजाभाऊ चोपदार बैठकीस उपस्थित होते.

Wari
Pandharpur Wari Management : वारी कालावधीत वारकऱ्यांच्या सुविधांबाबत योग्य नियोजन करावे

याबाबत दौंडे म्हणाले, ‘‘शहरातील महाद्वार, भराव रस्ता, गणेश दरवाजा, वाहनतळ, देहूफाटा, प्रदक्षिणा रस्ता, मरकळ रस्ता या ठिकाणचे अतिक्रमण त्वरित कारवाई करून जागा मोकळ्या कराव्यात. फुटपाथवर अतिक्रमण करून देवू नये. फुटपाथ वारकऱ्यांना चालण्यासाठी मोकळा करून द्यावा.

Wari
Aashadhi Wari 2024 : देवाच्या दारी, स्वच्छता भारी

वारी दरम्यान शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन व्यवस्थित करावे. पाण्याबाबत नागरिकांची ओरड होता कामा नये. स्वच्छतेबाबत नगरपरिषदेने काटेकोर नियोजन करावे. मंदिराकडे येणाऱ्या हजेरी मारुती मंदिर आणि नगरपरिषद चौक रस्त्यावर वारी काळात हातगाड्या, फेरीवाल्यांना बंदी आहे. इंद्रायणीतीरी महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी तात्पुरती चेंजिंग रूमची व्यवस्था करावी.’’

‘‘ऐन निवडणुकीच्या धामधुमीत वारीच्या सोयीसुविधा पुरविण्याकडे प्रशासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष न करता अधिक जबाबदारीने काम करावे.’’ असे आवाहन आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप यांनी आळंदीत केले. याप्रसंगी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी वारी काळात विभागवार चोवीस तास पाणी पुरवणे, आरोग्य सेवा, सुलभ शौचालये, पाण्यासाठी टॅंकरसेवा याबाबतची माहिती दिली. यावेळी डी. डी. भोसले यांनी इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलाचे कठडे बसविण्याची मागणी केली. तसेच वारी काळात स्थानिक तसेच ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडे प्रवेश पास दाखवूनही पोलिस होणारी अडवणूक, खंडित वीजपुरवठ्याबाबत प्रश्‍न उपस्थित केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com