Thane News: मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांचा धोकादायक प्रवास थांबलेला नाही. मागील दोन वर्षांत ३१८ साकव (लहान पूल) मंजूर होऊनही, आजही १८७ साकवांचे काम अपूर्ण आहे. यामुळे पावसाळ्यात नदी-नाले ओलांडण्यासाठी येथील ग्रामस्थांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलांचे हाल होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे..जिल्ह्याच्या ग्रामीण व आदिवासी पट्ट्यात साकव व पुलांची कमतरता ही समस्या वर्षानुवर्षे कायम असून पावसाळ्यात ती अधिक गंभीर रूप धारण करते. अनेक भागांमध्ये ओढे, नाले आणि लहान नद्यांना ओलांडणे हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरते. विशेषतः शालेय मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी वाहत्या पाण्यातून पाय रोवून पुढे जावे लागते. या पाण्यात पुस्तके व वह्या भिजू नयेत म्हणून ती डोक्यावर घेऊन मुले जीवघेणाप्रवास करतात..Jal Jeevan Mission : पाण्यासारखा पैसा खर्चूनही ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती.आरोग्यसेवेत मोठी अडचणसाकव नसल्यामुळे आरोग्यसेवा मिळणे हे सर्वांत कठीण काम होते. आकस्मिक परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी पर्यायी सुरक्षित मार्ग नसल्याने वेळेवर उपचार मिळणे अवघड होते. गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी दवाखान्यात नेण्यासाठी चारचाकी वाहन अथवा रुग्णवाहिकादेखील गावात पोहोचू न शकल्यामुळे गावकऱ्यांना अनेकदा साडीची झोळी तयार करून मानवी खांद्यावरून नदी ओलांडावी लागते..शैक्षणिक व आर्थिक व्यवहारांवर परिणामसुरक्षित प्रवास नसल्यामुळे मुलांचे शाळेत जाणे अनियमित होते आणि अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण पावसाळ्यात खंडित होते. शेतकरीवर्गालाही मोठा फटका बसतो. पिकांसाठी आवश्यक सामग्री आणणे, उत्पादने बाजारात नेणे किंवा शेतकामासाठी मजूर बोलावणे या सर्व गोष्टी धोकादायक व खर्चिक ठरतात..Heavy Rain : पुराचा धोका पत्करून शेतकरी, मजुरांची जीवघेणी कसरत.नियोजनाचा अभावनियोजन विभागाकडून यंदाच्या वर्षी २०२४-२५ साठी १५० साकवांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १३८ साकव बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. असे असले तरी, यंदा साकव मंजूर होऊनदेखील नियोजन विभागात नियोजनाच्या अभावामुळे एकही साकव बांधण्याच्या कामाला सुरुवात होऊ शकली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली..कामाला सुरुवातच नाहीठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील विविध गावांमध्ये आवश्यकतेनुसार साकव बांधण्यात येतात. त्यानुसार मागील दोन वर्षांत ३१८ साकव मंजूर करण्यात आले. त्यापैकी १३१ साकव पूर्ण झाले असून १८७ साकव आजही अपूर्ण आहेत. विशेष म्हणजे, सन २०२४-२५ या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या १३८ साकवांपैकी एकही साकव बांधण्याच्या कामाला सुरुवातच करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.