Yavatmal News: भारतात सर्वाधिक कापूस पिकविणारा जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळेच या भागात टेक्स्टाईल पार्कची मागणी होती. ती मान्य देखील करण्यात आली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ती लालफितीत अडकली असल्याने यंदाच्या हिवाळी अधिवेशनात तरी जिल्ह्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..यवतमाळ येथील काँग्रेसचे तत्कालीन आमदार नीलेश पारवेकर यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी संजय देशमुख यांच्यासोबत इचलकरंजीचा दौरा करून आल्यावर यवतमाळात टेक्स्टाईल पार्क बनविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना यवतमाळला बोलावले होते. श्री. चव्हाण यांनी मान्य केले होते, की जिल्ह्यातील ८० टक्के कापूस राज्याबाहेरील कापड गिरण्यांना पुरविला जाक असल्याने येथेच टेक्स्टाईल पार्क उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले..Textile Industry GST: टॉवेल, चादर उद्योगाला जीएसटी स्लॅबमध्ये कोणताही दिलासा नाही.तत्कालीन केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी महाराष्ट्रात सहा टेक्स्टाईल पार्क उभारण्यासाठी ११० कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, अजूनही यवतमाळसह इतर जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्क झाले नाही. विशेष म्हणजे यवतमाळजवळील लोहारा येथील औद्योगिक वसाहतीत २०८ हेक्टर जमीन ‘सेझ’ म्हणून घेतली होती. परंतु, दुर्दैवाने ती जमीन ‘सेझ’मधून काढून टाकण्यात आली..अधिक चौकशी केल्यावर ‘सेझ’मध्ये प्रस्तावित टेक्स्टाईल पार्क प्रकल्पात कापूस उत्पादक व कापड गिरणी क्षेत्रातील खासगी उद्योजकांनी सहभागी व्हावे, यासाठी एमआयडीसीने केलेल्या प्रयत्नांना अत्यल्प अथवा नगण्य प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एमआयडीसीने औद्योगिक वसाहतीमधील २०८ हेक्टर ‘सेझ’मुक्त केली..Textile Market India : कापूसकोंडी हटविण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप गरजेचा.२०११ मध्ये यवतमाळात ‘फायबर-२ फॅशन’ नावाने उद्योजकांची एक परिषद झाली. त्यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी टेक्स्टाईल पार्कची आवश्यकता, या विषयावर विचारमंथन झाले होते. मात्र, त्यानंतरही काहीही झालेले नाही. केवळ घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस असेच वर्षानुवर्षांपासून सुरू आहे.गिरण्या विदर्भाबाहेरप्रदेशाचा विकास हा त्या प्रदेशाला कसे नेतृत्व मिळाले आहे, यावर अवलंबून असतो. दुर्दैवाने जिल्ह्यात मोठमोठे नेते असूनही उद्योगांच्या बाबतीत त्यांचे नियोजन फेल झाल्याचे दिसून येते. टेक्स्टाईल पार्कची घोषणा होऊनही अद्याप काहीही झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात कापूस असूनही गिरण्या मात्र विदर्भाबाहेरच आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला भाव हवा असल्यास टेक्स्टाईल पार्क यवतमाळातच होणे गरजेचे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.