Latur News: ‘महावितरण’ने एकाच महिन्यात राज्यभरात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप लावण्याचा उच्चांक गाठला आहे. यामध्ये लातूर परिमंडलांतील तब्बल १० हजार ४०५ कृषिपंपांचा समावेश आहे. त्यामुळे ''मागेल त्याला सौर कृषिपंप'' योजनेमुळे दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होताना दिसत आहे..‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला असून, याची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (ता. पाच) गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटी मैदानावर होणार आहे. महावितरणने एकाच महिन्यात राज्यभरात ४५,९११ सौर कृषिपंप लावले असून यामध्ये लातूर परिमंडलांतर्गत येणाऱ्या बीड जिल्ह्यातील ७ हजार ४६७, धाराशिव जिल्ह्यातील २ हजार ३७ तर लातूर जिल्ह्यातील ९०० कृषिपंपांचा समावेश आहे, अशी माहिती महावितरणच्या लातूर परिमंडळातर्फे जाहीर करण्यात आली..Solar Agriculture Pump Scheme : सौर कृषीपंप योजनेसाठी आर्थिक मागणी झाल्यास बळी पडू नये ; महावितरणचे आवाहन.शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषिपंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषिपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो..Agriculture Solar Pump : सोलरही नाही अन् पैसेही परत मिळेना....अशी आहे प्रक्रियाया योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी पंपासाठी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर महावितरणकडून अर्ज मंजूर केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याने त्याचा हिस्सा भरायचा असतो. शेतकऱ्याकडून पंप बसविण्यासाठी एजन्सीची निवड केली जाते. .पंप बसविण्याच्या ठिकाणाची महावितरण, एजन्सी व शेतकरी अशी तिघांकडून संयुक्त पाहणी केली जाते, त्यानंतर कार्यादेश दिला जातो आणि शेतात पंप बसविला जातो. पंप बसविणाऱ्या एजन्सीवर पुढच्या काळात देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी आहे. सौर पॅनल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषिपंपाचे वीजबिल येत नाही आणि दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणीही पूर्ण होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.