Crop Heat Stress: खानदेशात कमाल तापमान सलग दोन दिवस ४२ अंश सेल्सिअसवर राहिले आहे. यामुळे केळी व अन्य फळबागांना फटका बसत आहे. उत्पादनासही यामुळे फटका बसेल, असे दिसत आहे. तापमानात मागील पाच - सहा दिवसांत मोठी वाढ झाली आहे. .२२ मार्चपर्यंत कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत होते. परंतु सहा ते सात दिवसांत तापमान सतत वाढले असून, पारा आता ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. तापमानात काही दिवसांत मोठी वाढ झाल्याने पिकांना फटका बसत आहे. शेतीकामे रखडत सुरू आहेत..Jowar Crop Care: अवकाळी पाऊस- गारपिटीमध्ये ज्वारी पिकाचे व्यवस्थापन कसे करावे?.ग्रामीण भागात नागरिक दाट झाडांच्या सावलीत दुपारच्या वेळी बसलेले दिसतात. लोकसभा निवडणुकीचे वातावरण एकीकडे तापत असताना दुसरीकडे तापमानांचा उच्चांकही वाढत आहे. मार्चअखेरच तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरवात केली आहे. मागील वर्षी मार्चअखेरपर्यंत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत होते. परंतु यंदा त्यात मोठी वाढ झाली आहे..Sugarcane Crop Protection: अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त पिकात करावयाचे उपाय.केळी, पपई, कलिंगड, खरबूज व अन्य पिकांचे सिंचन करण्यासंबंधी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. रोज पिकांना दोन ते अडीच तास पाणी द्यावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस शेतात थांबून सिंचन करून घेतले जात आहे. दुपारी बारानंतर उन्हाची तीव्रता वाढते. ती सायंकाळी पाचपर्यंत कायम असते. यामुळे अनेकांनी दुपारनंतर उन्हात जाऊन कामे करण्याचे टाळले आहे. जी कामे आहेत ती दुपारी बाराच्या आत करून दुपारी उष्णतेपासून बचाव करण्याचा प्रयत्न शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत..उष्माघात कक्षांची गरजग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्षांची गरज आहे. कारण उष्णता वाढलेली असतानाच लग्नसराई व शेतीकामेही सुरू आहेत. उष्णतेत अपघात किंवा उष्माघातासंबंधीची समस्या तयार होऊ शकते. यामुळे ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांत पुरेसा औषधसाठा, उष्माघात कक्ष व कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या आवश्यक आहे, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.