शेतकऱ्यांना आता युरिया खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाहीआता ते घरबसल्या युरिया खरेदीसाठी बुकिंग करु शकतात तेलंगणा सरकारचे शेतकऱ्यांसाठी 'फर्टिलायझर बुकिंग अॅप'.Urea Purchase: शेतकऱ्यांना युरियाचा सुरळीत पुरवठा आणि विक्री व्यवहार पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी तेलंगणा सरकारने ऑनलाईन बुकिंग प्रणाली सुरु केली आहे. जमीनधारक शेतकरी तसेच औपचारिक कागदपत्रे नसलेले खंडाने शेती करणारे शेतकरीदेखील सरकारच्या अॅप सुविधेद्वारे युरिया खरेदीसाठी बुकिंग करू शकतात. पण कागदपत्रे नसलेल्या शेतकऱ्यांना, युरिया पुरवठा करण्यापूर्वी त्यांनी केलेल्या भात विक्री तपशीलांची पडताळणी केली जाणार आहे..हे अॅप अँड्रॉइड फोनसाठी 'फर्टिलायझर बुकिंग अॅप' म्हणून उपलब्ध करण्यात आले आहे. त्याची नुकतीच पेड्डापल्ली जिल्ह्यात चाचणी घेण्यात आली. आणखी १० जिल्ह्यांमध्ये त्याची चाचणी घेण्याचे ठरविले आहे. तर पुढील आठवड्याच्या सुरुवातीला राज्यभरात ही सुविधा सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे..खरीप हंगामात युरियाची मोठी टंचाई शेतकऱ्यांना जाणवली. शेतकऱ्यांना युरिया खरेदीसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागले. युरियाच्या पुरवठ्यावरून कृषी अधिकाऱ्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. युरियाच्या उपलब्धतेवरुन शेतकऱ्यांमध्ये असलेली चिंता दूर करणे हा यामागील उद्देश असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी बुकिंग केलेल्या युरिया पिशव्या एका दिवसासाठी राखीव ठेवल्या जातील. तर बुकिंग २४ तासांसाठी वैध असणार आहे..या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आता कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर रांगेत उभे राहण्याची गरज नाही. बुकिंगची माहिती आणि ओटीपी याद्वारे शेतकरी कोणत्याही दुकानातून युरिया खरेदी करु शकतात. .Urea Fertilizer Linking: खतांच्या लिंकिंगचा शेतकऱ्यांना भुर्दंड! २६६ रुपयांचं युरियाचं पोतं १,६५० रुपयांना; कैलास पाटील काय म्हणाले?.या प्रणालीमुळे युरिया पुरवठ्याशी संबंधित असलेल्या समस्या सुटतील. प्रत्येक बुकिंगसाठी प्रत्येक १५ दिवसांनी एकदा परवानगी दिली जाईल. युरियाचा चार टप्प्यांत पुरवठा केला जाईल. ही प्रणाली युरिया दुसरीकडे वळवणे आणि त्याचा अतिवापर रोखण्यास मदत करेल, असा दावा कृषी अधिकाऱ्यांनी केला आहे..Urea Shortage: युरिया तुटवड्याची समस्या कृषी मंत्र्यांच्या दालनात.शेतकऱ्यांना आता रांगेत उभे राहावे लागणार नाहीतेलंगणाचे कृषिमंत्री तुम्मला नागेश्वर राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, निविष्ठा केंद्रावर शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी हे मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. शेतकरी आपल्या जमिनीच्या क्षेत्रानुसार मोबाईल अॅपद्वारे युरियाचे बुकिंग करू शकतात. युरिया खरेदी शेतकऱ्यांना जिल्ह्यातील त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही विक्रेत्याकडून करता येईल. तसेच अॅपमधून युरियाचा साठा उपलब्धतेची माहितीही शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.