तेलंगणा सरकारचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल खासगी व्यापाऱ्यांना न विकण्याचे आवाहननुकसानीबाबत शेतकऱ्यांना केले सतर्कसीसीआयकडून २१ ऑक्टोबरपासून सुरु होणार कापूस खरेदी.Cotton Procurement : भारतीय कापूस महामंडळ (CCI) यांच्याकडून २१ ऑक्टोबरपासून कापूस खरेदी सुरु होणार आहे. त्याआधीच काही शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करत आहेत. यामुळे त्यांचे नुकसान होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. याची गंभीर दखल तेलंगणा सरकारने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करण्याची घाई करु नये, असे आवाहन तेलंगणा राज्य कृषी आणि शेतकरी कल्याण आयोगाने केले आहे..याबाबत तेलंगणा राज्य कृषी आणि शेतकरी कल्याण आयोगाचे अध्यक्ष एम. कोडंडा रेड्डी यांनी, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल खासगी व्यापाऱ्यांना विकू नये, असे आवाहन केले आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांनी सीसीआयकडून केल्या जाणाऱ्या अधिकृत खरेदीची वाट पाहावी, असेही त्यांनी नमूद केले आहे..Cotton Disease: कपाशीच्या पातेगळच्या व्यवस्थापनासाठी सोपे उपाय.त्यांनी याबाबत नुकतीच सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा केली आणि शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करण्याची घाई केल्याने त्यांना येत असलेल्या समस्या निदर्शनास आणून दिल्या. यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यांनी सीसीआय खरेदी प्रक्रियेत काही मध्यस्थांचा सहभाग असणे आणि गेल्या वर्षीच्या तेलंगणामधील कापूस खरेदीतील त्रुटींकडेही सीसीआयचे लक्ष वेधून घेतले..Cotton Farmers: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा .कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये, अशा पद्धतीने कापूस खरेदी प्रक्रिया राबविण्याचे निर्देश तेलंगणा कृषी आयोगाने सीसीआयला दिले आहेत. याबाबत आयोगाने शेतकऱ्यांना काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचाही सल्ला दिला आहे. ज्यात १२ टक्क्यांपर्यंत आर्द्रता राखणे, शेतातून कापूस खरेदी केंद्रांवर आणताना तो पिशव्यांमध्ये न आणता खुल्या स्वरूपात आणावा, असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे..दरम्यान, कृषी मंत्री तुम्मला नागेश्वरा राव, सीसीआयचे अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्यात आज (दि. ६ ऑक्टोबर) बैठक होत आहे. यात कापूस खरेदीतील अडचणी दूर करण्याबाबत चर्चा होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.