Agriculture Drone Subsidy Scheme: तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांना अनुदानित दरात शेतीसाठी ड्रोन पुरवण्याची योजना आखली आहे. याबाबतची माहिती राज्याचे कृषिमंत्री तुम्मला नागेश्वर राव यांनी नुकतीच दिली. राज्य सरकार शेतकऱ्यांना अनुदानित दरात शेतीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्याची योजना आखत असल्याचे त्यांनी सांगितले..आधुनिक शेतीमध्ये आता ड्रोनाचा वापर केला जात आहे. विशेषतः कीडनाशके, अन्नद्रव्यांच्या फवारणीसाठी याचा वापर केला जातो. तसेच मोठ्या जमीन क्षेत्रावरील पिकाचे ड्रोनच्या माध्यमातून निरीक्षण करणे सोपे झाले आहे. .खम्मम जिल्ह्यातील रघुनाधापालेम मंडळात शेती ड्रोनचे उद्घाटन करताना, कृषिमंत्री नागेश्वर राव यांनी सांगितले की शेतीसाठी ड्रोनचा वापर कसा करावा? यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून प्रशिक्षण दिले जाईल. उपग्रह साहाय्य तंत्रज्ञानाचा वापर करून रोग प्रादुर्भाव क्षेत्रांवर कीडकनाशक फवारणी करण्यासाठी एक प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे..Agriculture Drone Subsidy: कृषी ड्रोनसाठी ४ ते १० लाखांपर्यंत अनुदान, ‘केडीसीसी’कडून कर्ज, तरुणांना संधी, घ्या काय आहे ही योजना?.शेतकऱ्यांनी कमी खर्चात आणि उत्पन्न वाढवणाऱ्या आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. पीक उत्पादकता आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक शेती यंत्रसामग्री आणि वैज्ञानिक पद्धतींचा अधिक वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच मातीची सुपीकता टिकून राहण्यासाठी खतांचा आणि कीडनाशकांचा अतिवापर टाळा, असेही ते म्हणाले..Drone Pilot Training: ड्रोन चालवायचा आहे? लायसन्स, प्रशिक्षण आणि सरकारी योजना जाणून घ्या!.गेल्या काही दिवसांत युरियाचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांनी राज्यात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला. काही शेतकरी प्रति एकर क्षेत्रासाठी १० ते १२ क्विंटल युरियाचा वापर करत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी नमूद केले. अशा पद्धतीने युरिया अतिवापर केल्यास सुपीक शेत जमीन नापीक होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला..माती तपासणीची नोंद नियमितपणे अद्ययावत करण्यासाठी उपाययोजना आखल्या जातील. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीच्या सद्यस्थितीचे अहवाल पुरवले जातील. तसेच उत्पादनावर कोणताही परिणाम न होता शेतीसाठी होणारा खर्च कसा कमी करता येईल?, यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.राज्यातील बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आणि सीमांत शेतकरी असल्याचे नमूद करत, त्यांनी शेतकऱ्यांसाठी योग्य अशा उपकरणांची रचना आणि निर्मिती करण्याचे आवाहन शेती यंत्रसामग्री उत्पादकांना केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.