Nashik News: नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. ९) महसूल विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महसूलशी संबंधित २० महत्त्वपूर्ण विषयांवर प्रश्न तयार करून उपस्थित प्रांताधिकारी व तहसीलदारांना ते सोडविण्यास सांगितले. त्यात संबंधित मुद्द्यांची सद्यःस्थिती, प्रलंबितता व ते मार्गी लावण्यासाठी करायच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने उत्तरे द्यायची होती. या परीक्षेचा निकाल ६ जानेवारीच्या बैठकीत घोषित केला जाणार असला, तरी ऐनवेळी हाती पेपर आल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली..जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच महसूल विभागाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीसाठी सर्व प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, तसेच तहसीलदार उपस्थित होते. याप्रसंगी प्रत्येक अधिकाऱ्याने त्याच्या क्षेत्रातील महसूलविषयक बाबींचा लेखाजोखाच सोबतीला आणला होता..Agricultural Services Examination : निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या कधी?.परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलशी संबंधित ५४ पैकी २० च विषयांवर एक प्रश्नपत्रिका तयार करून अधिकाऱ्यांपुढे केली. तसेच पुढील दीड तासात संबंधित प्रश्नांचे लेखी उत्तर सादर करावे, असे सांगण्यात आले. हे प्रश्न सोडविताना तालुकानिहाय सध्याची स्थिती, प्रकरणांचा निपटाऱ्यासाठी लागणार कालावधी, प्रकरणे प्रलंबित असल्यास त्याची कारणे, तसेच येणाऱ्या अडचणींबाबतची माहिती व करायच्या उपाययोजना नमूद करायच्या होत्या..Revenue Department : महसूल मंत्र्यांच्या छाप्यानंतर उपनिबंधक कपले निलंबित .अधिकाऱ्यांनी चर्चा करून प्रश्नांची उत्तरे सादर केली आहेत. हे पेपर तपासणीसाठी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यात अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण (मालेगाव) व हेमांगी पाटील (नाशिक), निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे आणि कुंदन हिरे यांचा समावेश आहे. हे अधिकारी पेपर तपासून त्यातील त्रुटी, चांगल्या बाबी व करायची सुधारणा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. त्यानुसार ६ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली.....या विषयांचा आढावामहसूल आढावा बैठकीत शेतकरी नुकसानभरपाईची मदत वाटपावर चर्चा झाली; तर ॲग्रीस्टॅक नोंदणी, वारसांची वंशावळीची नोंद अचूक करणे, भूसंपादनाची प्रकरणे, घरकुलांसाठी मोफत वाळू योजनेची अंमलबजावणी, अवैध वाळूबाबत ई-पंचनामा करणे बंधनकारक असणे, मनरेगा, महसूल संदर्भातील न्यायालयीन प्रकरणांसह अन्य बाबींचा समावेश होता. त्यात भरपाई व ॲग्रीस्टँक नोंदणी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी; तर महसूल न्यायालयीन प्रकरणे मार्गी लावण्यासाठी विशेष मोहीम घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केल्या..शासनाची ध्येयधोरणे आणि निर्णयांची अंमलबजावणी करून त्याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात महसूलची भूमिका महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने महसूल आढावा बैठकीत कृतिआराखडा तयार करण्यात येईल. सर्व अधिकाऱ्यांनी महसुली कामकाजाची उद्दिष्टे विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.