Nagpur News : महाडीबीटीच्या माध्यमातून गैरप्रकारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी यातील तांत्रिक दोष कायम आहेत. त्याच्याच परिणामी मल्चिंगच्या लाभासाठी लॉटरीच्या माध्यमातून पोर्टलवर निवड झालेल्या २४४ पैकी २३३ लाभार्थ्यांचे अर्ज रद्द झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र निवड झालेल्या लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे अर्ज रद्द होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. .कृषी विभागाच्या माध्यमातून योजनांचा लाभ देण्यासाठी यापूर्वी थेट अर्ज प्रक्रिया राबविली जात होती. यामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीला लाभ मिळावा याकरिता मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत होते. त्यातून आर्थिक स्वार्थदेखील साधला जात होता. त्यावर नियंत्रणासाठी शासनाने थेट लाभ योजना राबविण्याचा निर्णय घेतला. .त्या अंतर्गत पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास संबंधित योजनेअंतर्गत लाभाची रक्कम त्याच्या थेट खात्यात जमा केली जाते. मात्र या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. त्याच्या परिणामी लाभार्थ्यांना योजनांचा लाभ योग्य वेळी मिळत नाही अशी स्थिती आहे..तण नियंत्रण त्याबरोबरच बाष्पीभवन रोखण्यात उपयोगी ठरणाऱ्या मल्चिंगसाठी देखील कृषी विभागाची योजना आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले. यापैकी जिल्ह्यातील एकूण २४४ लाभार्थ्यांची प्राथमिक निवड या योजनेसाठी करण्यात आली. .Soyabean Seed: महाडीबीटीवरून मिळणार शेतकऱ्यांना अनुदानित सोयाबीन बियाणे.मात्र यापैकी तब्बल २३३ अर्ज विविध कारणांनी रद्द झाले आहेत. उर्वरित ११ अर्ज प्रक्रियेत आहेत. यातील ९ शेतकऱ्यांची कागदपत्रे अद्याप ऑनलाइन प्रणालीवर अपलोड करण्यासाठी अडचणी येत असल्याने निवड होऊनही या योजनेचा लाभ मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे..संकेतस्थळ वारंवार बंदशासनाच्या योजनेत पारदर्शकता यावी यासाठी सर्व कामकाज ऑनलाइन करण्यात आले. मात्र संकेतस्थळ वारंवार बंद राहते, अर्ज सबमिट झाल्यानंतरही स्थिती ‘अपूर्ण’ दाखवली जाते. अशा एक ना अनेक समस्यांना शेतकऱ्यांना समोर जावे लागत आहे. मात्र संकेतस्थळाला गती येत नसल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत..Maha DBT: सातबारा, ८ अ आणि आधार क्रमांकाची महाडीबीटीसाठी गरज नाही?....तर योजनेपासून वंचित राहण्याची शक्यताशेतीतील आर्द्रता टिकवून ठेवणे, पाणी वापर कमी करणे, पिकांचे उत्पादन वाढवणे हा या योजने मागील उद्देश आहे. परंतु अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, ऑनलाइन कागदपत्र अपलोड न होणे, माहितीच्या अभावामुळे अनेक शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे..चुकीच्या माहितीमुळे अर्ज रद्दकाही अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीमुळे स्वयंचलितपणे रद्द झाले आहेत. आवश्यक दुरुस्ती करून संबंधितांना पुन्हा अर्ज सादर करण्याची संधी आहे. मात्र वेळेत न झाल्यास लाभ मिळून शकणार नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले..अनेक लाभार्थी केवळ अर्ज करतात नंतर निवड झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द होऊन यादीतील दुसऱ्या शेतकऱ्यांची निवड होते. त्यामुळे अर्ज रद्द होऊन इतर शेतकऱ्यांची निवड होणे ही नियमित प्रक्रिया आहे.- रवींद्र मनोहरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.