Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळ नुकसान भरपाईसाठी ४५३ कोटींचा निधी मंजूर
Farmer Relief: डिसेंबर २०२४ मध्ये फेंगल चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीनंतर अखेर तमिळनाडू सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी ४५३ कोटी रुपयांच्या भरपाईला मंजुरी दिली असून, सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात आर्थिक मदत मिळणार आहे.