Nandurbar News : शहरासह तालुक्यात यंदा पावसाने चांगले सातत्य राखत कधी जोरदार, तर कधी रिपरिप लावली. त्यामुळे खरिपाची पिके तरारली असून, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले रोझवा, पाडळपूर, सिंगसपूर, गढावली व धनपूर हे सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. एकंदरीत आतापर्यंत झालेल्या पावसाने बळीराजा चांगलाच सुखावला आहे..तळोदा शहरासह तालुक्यात यंदा जोरदार पाऊस पडेल या अपेक्षेने मागची सर्व चिंता झटकून शेतकरी नव्या उमेदीने कामाला लागला होता. जून महिन्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला आणि त्यानंतर संपूर्ण महिनाभर पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात अपेक्षेइतका पाऊस झाल्याने, जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरिपाच्या पिकांची लागवड केली. .Khandesh Rainfall : अनेक तालुक्यांत १०० टक्क्यांवर पाऊस .दरम्यान, जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली, मात्र नंतर मोठी विश्रांती घेतली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला देखील पावसाने दडी मारली होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात शहरात व तालुक्यात दमदार पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात चांगलीच रिपरिप लावली..त्यामुळे शेतातील पिकांना जीवदान मिळाले. कापूस, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन आदी खरीप पिके तरारली आहेत. तसेच, सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात देखील दमदार पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांची चिंता मिटली आहे. .Parbhani Rainfall : ऑगस्टमध्ये पाच वर्षानंतर सरासरीपेक्षा जास्त पाऊस.आतापर्यंत झालेल्या पावसाने तालुक्यातील गढावली, रोझवा, सिंगसपूर, धनपूर, पाडळपूर व इच्छागव्हाण हे सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यांच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने नद्या-नालेही खळखळून वाहत आहेत. यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत, सध्याच्या अनुकूल परिस्थितीमुळे बळीराजा समाधान व्यक्त करीत आहे.ब.तळोदा तालुक्यात ३,६५२ मिमी पाऊसतळोदा तालुक्यात एकूण ३,६५२ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यापैकी तळोदा मंडळात ९०९ मि.मी., बोरद मंडळात ६९७ मि.मी., सोमावल मंडळात १,०६० मि.मी. आणि प्रतापपूर मंडळात ९६८ मि.मी. पाऊस झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.