Rain Break: तळोदा शहरासह तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, त्यातच तापमानात वाढ झाल्याने खरिपातील पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. सोयाबीन, कापूस, ऊस, ज्वारी, मका यांसह अन्य पिकांना सध्या पावसाच्या सरींची नितांत आवश्यकता आहे. पावसाने आणखी काही दिवस ओढ दिल्यास पिके कोमेजण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे..यंदाच्या पावसाळ्यात तळोदा तालुक्यावर पावसाची काहीशी अवकृपाच राहिली आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, एक-दोन दिवसांच्या पावसानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. जुलैच्या उत्तरार्धात पावसाने काही प्रमाणात चांगली हजेरी लावल्यानंतर खरिपाच्या पेरण्यांना वेग आला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला होता..Satara Rain Update : सातारा जिल्ह्यात पावसाच्या ओढीने पिके संकटात.शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत पिकांची योग्य निगा राखली. निंदणी, कोळपणी यांसह शेतीतील आवश्यक कामेही वेळेत उरकून घेतली. त्यामुळे काही काळ पिकांची वाढ समाधानकारक राहिली. मात्र, आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..Satara Rain Update : सातारा जिल्ह्यात पावसाच्या ओढीने पिके संकटात.गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा थेंबही नसल्याने आणि दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने शेतातील पिकांची परिस्थिती नाजूक होऊ लागली आहे. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील पिके पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. सध्या अनेक ठिकाणी पिके केवळ तग धरून उभी असून, त्यांना वाढीसाठी पावसाची गरज आहे..लघुसिंचन प्रकल्पांमध्ये जेमतेम जलसाठाआता जवळपास ऐंशी टक्के मान्सूनचा हंगाम झाला आहे. मात्र असे असतानाही तळोदा तालुक्यातील लघुसिंचन प्रकल्पांमध्ये जेमतेम जलसाठा आहे. शिवाय कमी पावसामुळे परिसरातील नदी, नाले देखील पूर्णपणे प्रवाहित झालेले नाहीत. आणि त्याचा विपरीत परिणाम पाण्याच्या पातळीवर होत आहे व भविष्यात देखील होणार आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कशी वाढेल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे..अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. सध्या पिकांची अवस्था चांगली असली, तरी आता पिकांना पावसाच्या पाण्याची गरज भासू लागली आहे. आणखीन काही दिवस पावसाने ओढ दिल्यास, पिकांना त्याचा फटका बसण्यास सुरुवात होईल. तसेच कमी पावसामुळे हळूहळू पाण्याची पातळी कमी होत चालली आहे.- अरुण चव्हाण, शेतकरी, चिनोदा, जि. नंदुरबार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.