Pune News: ऑनलाइन कामे जलद होण्यासाठी राज्यातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांना ९४ कोटी रुपयांच्या लॅपटॉप खरेदीची प्रक्रिया चालू झाली आहे. दुसऱ्या बाजूला लॅपटॉप खरेदी रखडवल्याने नाराज असलेले सहायक कृषी अधिकारी पुन्हा आंदोलनाची तयारी करीत आहेत. राज्यातील सातबारा उतारा तसेच जमीनविषयक कागदपत्रांशी संबंधित कामकाजाचे संगणकीकरण केले जात आहे. ऑनलाइन कामे करण्यासाठी आम्हाला साधने पुरवा, अशी मागणी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांनी केली होती. .मात्र सुरुवातीला शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे क्षेत्रिय महसूल अधिकारी संतापले. त्यांनी काही दिवसांपूर्वी ऑनलाइन कामे थांबवली. यामुळे मंत्रालयात धावपळ होऊन खरेदी लॅपटॉप खरेदीच्या निविदांना तत्काळ मंजुरी दिली गेली आहे..Department Of Revenue : मंडल, तलाठी कार्यालयांतही आता होणार ‘ई- ऑफिस’.जमाबंदी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीनविषयक दस्तावेजांचे संगणकीकरण झाल्यामुळे जनतेची सोय झालीच; पण ऑनलाइन उतारे विकून शासनालादेखील कायमस्वरूपी महसूल मिळू लागला आहे. त्यामुळे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक सुविधांवर गुंतवणूक करणे अजून फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना ८३०० लॅपटॉप व १०२०० प्रिंटर पुरवले जातील. खरेदीसाठी आयुक्तालयाच्या पातळीवर निविदा काढण्यास महसूल विभागाने मान्यतादेखील दिली आहे. या निविदा ९४ कोटी ४० लाख रुपये किमतीच्या असतील..महसूल विभागातील लॅपटॉप खरेदीला वेग आल्यामुळे क्षेत्रीय महसूल अधिकारी वर्ग खुशीत आहे. दुसरीकडे कृषी अधिकाऱ्यांचा संताप मात्र वाढतो आहे. ‘‘महसूल कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन कामावर केवळ दहा दिवस बहिष्कार टाकला. त्यानंतर लगेच त्यांच्या लॅपटॉप खरेदीच्या निविदांना मान्यता मिळाली..Laptop Scheme: लॅपटॉप खरेदी प्रस्ताव दाबून ठेवला .मात्र कृषी कर्मचाऱ्यांनी १३ दिवस पूर्णपणे कामबंद आंदोलन करूनही आमचा प्रश्न ‘जैसे थे’ ठेवला आहे. उलट, आम्ही कामे बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरतो, असा अपप्रचार केला गेला. महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांना एकाच प्रकारची सुविधा देताना सापत्नपणा दाखवला जात आहे. त्यामुळे आम्हीदेखील आता ऑनलाइन कामांवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहोत,’’ असे सहायक कृषी अधिकारी संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले..लॅपटॉप की टॅब, घोळात घोळ चालूकृषी विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांना लॅपटॉप देण्याचा घोळ फेब्रुवारीपासून चालू आहे. त्यासाठी अनेक बैठका, आंदोलन झाले. त्यानंतर आता लॅपटॉपऐवजी टॅब पुरविण्याची टूम निघाली आहे. ‘‘आम्हाला दर्जेदार लॅपटॉपच द्यावेत; निकृष्ट टॅब आम्ही अजिबात ताब्यात घेणार नाही,’’ अशी भूमिका क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी घेतली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.