Sugarcane Price Protest: गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गडहिंग्लज साखर कारखान्याने ३४०० रुपये दर जाहीर केला. मात्र, ऊस उत्पादकांना तो मान्य नाही. गडहिंग्लजसह विभागातील पाच कारखान्यांनी ३६०० रुपये पहिली उचल द्यावी, या मागणीसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारपासून (ता. १४) पदयात्रा काढली जाणार आहे. १५ गावांतून ही पदयात्रा निघणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी पत्रकार परिषदेत दिली. .श्री. गड्यान्नावर म्हणाले, ‘‘स्वाभिमानीच्या ऊस परिषदेनंतर ऊस दरासाठी १० नोव्हेंबरची डेडलाइन दिली होती. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी ३५०० ते ३६५३ रुपयांपर्यंत दर जाहीर केले आहेत. पण, गडहिंग्लज विभागातील कारखान्यांनी दर जाहीर केले नव्हते. सोमवारी गडहिंग्लज साखर कारखान्याने ३४०० रुपये दर जाहीर केला. तो दर ऊस उत्पादकांना मान्य नाही. आम्ही त्याबाबत लोकांची मते जाणून घेतली आहेत. गडहिंग्लज विभागातील पाच कारखान्यांकडून ३६०० रुपये पहिली उचल आणि थकित एफआरपीचे ३१ कोटी रुपयांसाठी लढा कायम राहणार आहे.’’.Sugarcane Management: पूरबाधित उसाचे व्यवस्थापन तंत्र.ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या नूल (ता. गडहिंग्लज) गावातून शुक्रवारी सकाळी आठला पदयात्रेला प्रारंभ होईल. सुरगिश्वर मठाचे गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, हत्तरगी कारीमठाचे गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती आहे. मुगळी, जरळी, दुंडगे, गडहिंग्लज, भडगाव, हुनगिनहाळ, हरळी बुद्रुक, हरळी खुर्द, महागाव या गावातून पदयात्रा निघेल. महागावमधील शिवाजी चौकात रात्री जाहीर सभा होणार आहे. शनिवारी (ता. १५) महागाव, उंबरवाडी, सुळे, बटकणंगले, शिप्पूर तर्फ नेसरी, नेसरी या गावातून पदयात्रा जाणार आहे. नेसरीतील मसणाई मंदिरात सभा होणार आहे. या सभेला माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत.’’ बसवराज मुत्नाळे, दिलीप बेळगुद्री, धनाजी पाटील, बाळगोंडा पाटील, अशोक पाटील, मलाप्पा आमाते, सुरेश चौगुले, उत्तम पाटील, श्रीधर पाटील आदी उपस्थित होते..Sugarcane FRP: चाळीस कारखान्यांनी थकवली ‘एफआरपी’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.