Satara News : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिलला जाणाऱ्या उसाची वाहने अडवून जोपर्यंत ऊसदर घोषित केला जात नाही, तोपर्यंत उसाचे एक कांडेही गाळपासाठी जाऊ देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला..राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत ऊस गाळप परवाना मिळालेला नसतानाही जरंडेश्वर शुगर मिलने गळीत हंगामाला सुरुवात केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होत असून, त्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध आहे. .या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास प्रवक्ते श्री. पवार, संघटनेचे खटाव तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे यांनी वर्धनगड घाटाच्या पायथ्याशी जरंडेश्वर शुगर मिलची उसाची वाहने अडवून शेती अधिकारी श्री. थोपटे, ऊस पुरवठा अधिकारी संतोष कणसे, हणमंत क्षीरसागर आदींना समक्ष भेटून जाब विचारला. .Sugarcane Season : आम्ही चाललो ऊस तोडणीला....ऊसदर घोषित न करता कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो पूर्ण ताकदीने हाणून पाडू, असा इशारा दिला. त्यावर या सर्व अधिकाऱ्यांनी आमची हंगामाची पूर्व तयारी सुरू आहे. एक ते दोन दिवसांत याबाबत वरिष्ठांशी बोलण्याची ग्वाहीही त्यांनी दिली..दरम्यान, यावेळी कोरेगाव पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दल प्रवक्ते अनिल पवार यांनी सवाल उपस्थित केला. जेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महामार्गावर आंदोलन करतो, तेव्हा कोरेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी कारखान्याच्या दबावाखाली येऊन जागे होतात..Sugarcane Season : मराठवाड्यात नॅचरल शुगर उच्चांकी ऊसदर देणार.शेतकरी हितासाठी आंदोलन करताना, कोणताही गुन्हा केलेला नसताना निष्कारण आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. आता कारखाना प्रशासनाने नियमभंग केलेला आहे, तेव्हा कोरेगावचे पोलिस निरीक्षक कुठे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला..शेतकऱ्यांचे नुकसानमहामार्गाच्या कडेला उसाची वाहने थांबली असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. ऊस थांबवून ठेवण्याने त्याचा मोठा आर्थिक तोटा होत आहे. शासन व जिल्हा प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून ऊसदर जाहीर करावा आणि गाळप हंगामाची प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.