Nagpur News : विदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तयार झालेल्या नेतृत्वाने संघटनात्मक विस्तारावर भर देण्याऐवजी राजकारणात आपले स्थान बळकट करत ‘स्वाभिमानी’ला सोडचिठ्ठी दिली. त्यामध्ये नव्याने यवतमाळ जिल्हाध्यक्ष विश्वास लांडगे यांचीदेखील भर पडली आहे. त्यामुळे ‘स्वाभिमानी’साठी विदर्भाची वाट बिकट असल्याची चर्चा रंगली आहे. .पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांप्रमाणे विदर्भातील शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक लढा उभारण्याचा मानस ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी वारंवार व्यक्त केला. त्याकरिता रविकांत तुपकर, देवेंद्र भुयार यासारख्या लढवय्या नेत्यांवर विश्वासही टाकला. परंतु आमदार होताच देवेंद्र भुयार यांनी राजू शेट्टी यांची साथ सोडली. त्यानंतर या यादीत श्री. तुपकर यांची भर पडली..Raju Shetti: मुंबई बाजार समितीतील अनियमित व्यवहार थांबवावेत पणन संचालकांना राजू शेट्टींचे पत्र.‘स्वाभिमानी’च्या माध्यमातून विधानसभा लढविण्यासाठी रविकांत तुपकर उत्साही होते. परंतु महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यातील संबंधामुळे प्रत्येकवेळी तयारी करूनदेखील त्यांना ‘स्वाभिमानी’च्या गोटातून निवडणूक लढविण्यास ऐनवेळी नकार कळविला जात होता. .यातूनच श्री. तुपकर आणि श्री. शेट्टी यांच्यातील दरी वाढत गेली आणि अखेरीस तुपकर यांनीदेखील श्री. शेट्टी यांची साथ सोडली. त्यानंतर श्री. तुपकर यांनी शेतकरी संघटना (क्रांतिकारी) नावाचे स्वतःची संघटना उभारली. परिणामी स्वाभिमानीला विदर्भात अपेक्षित विस्तार करता आला नाही..Raju Shetti: जलसंपदा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा: राजू शेट्टी .यवतमाळमध्येही सोडली साथआत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात मनीष जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी शेतीप्रश्नांवर अनेक आक्रमक आंदोलनेदेखील केली. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या संख्येने गुन्हे दाखल आहेत. असे असताना अचानक त्यांच्या जागेवर विश्वास लांडगे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अवघ्या एकाच वर्षात लांडगे यांनी ‘स्वाभिमानी’ची साथ सोडली..शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता यावे याकरिता मी ‘स्वाभिमानी’ची कास धरली. शेतीप्रश्नांवर आंदोलन केल्याने गुन्हेही दाखल आहेत. त्यानंतर माझ्यावर प्रदेश प्रवक्तापदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतरही शेतकऱ्यांचा लढा मी कायम ठेवला.- मनीष जाधव, प्रदेश प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना.संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात नेतृत्व घडविण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. ही समस्या केवळ विदर्भापुरतीच मर्यादित नाही तर राज्यभरात असे अनुभव आले. सदाभाऊ खोत हे त्यातीलच एक उदाहरण आहे. रविकांत तुपकर यांनादेखील निवडणूक लढवण्याची संधी दिली.- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना .शेती क्षेत्रात आपल्याशिवाय इतर कोणतेच नेतृत्व तयार होऊ नये यासाठीच संधी असतानादेखील अनेकांना सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी खेळली गेली. सदाभाऊ खोत आणि आम्ही राज्यभरात संघटनेचा विस्तार केला. परंतु हकालपट्टीच्या माध्यमातून त्याचे फळ आम्हाला मिळाले. केवळ आपण सतत सत्तेत असावे, असे राजू शेट्टी यांना वाटते. त्या महत्त्वाकांक्षेतूनच संघटनेतील शिलेदारांचा बळी दिला जात आहे.- रविकांत तुपकर, अध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना.महायुती सरकारमध्ये मला कृषी राज्यमंत्रिपद मिळणार होते. परंतु ऐनवेळी राजू शेट्टी यांनी माझा गेम केला. एकंदरीतच त्यांची वृत्ती छोट्या नेतृत्वाला संपवण्याची आहे. - देवेंद्र भुयार, माजी आमदार- देवेंद्र भुयार, माजी आमदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.