Sangli News : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळपाची तयारी केली असून ऊस तोडणी मजूरही दाखल झाले आहेत. येत्या आठवड्याभरात कारखाने सुरू होतील. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकत्याच घेतलेल्या ऊस परिषदेत उसाला प्रतिटन ३७५१ रुपये विना कपात पहिली उचल द्यावी, अशी मागणी केली आहे. .मात्र, जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी याबाबत चर्चाही करण्यास उत्सुकता दाखवली नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून एफआरपीचे तुकडेच केले जात आहेत. त्यामुळे कारखानदार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे..जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ९०४ हेक्टरवरील उसाचे गाळप होणार आहे. जिल्ह्यात यंदाच्या गाळप हंगामात ६ साखर कारखाने १ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्यास सज्ज आहेत. यंदाचा गाळप हंगाम अवघ्या १० दिवसांवर आला आहे. दर वर्षी सुमारे एक लाख मजूर ऊस तोडणीसाठी दाखल होतात, असे साखर कारखान्यांनी सांगितले आहे. .Sugarcane Bill: प्रति टन १५ रुपये कपातीतून शेतकऱ्यांच्या पैशांवर दरोडा.आजमितीस पन्नास टक्के मजूर दाखल झाले आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत उर्वरित मजूर दाखल होतील. जिल्ह्यात आडसाली, पूर्व हंगामी, सुरू, खोडवा असे सर्वाधिक ऊसक्षेत्र वाळवा तालुक्यात आहे. पाठोपाठ मिरज, खानापूर, आटपाडी, पलूस तालुक्यांत ऊस आहे..स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिली उचल मागणी केली जाते. मात्र, त्याकडे कारखानदार दुर्लक्ष करतात. यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नुकतीच ऊस परिषद झाली. या परिषदेत उसाला प्रतिटन ३७५१ रुपये विना कपात पहिली उचल द्यावी, अशी मागणी केली आहे. .Sugarcane Bill Deduction : उसाचा काटा मारणाऱ्यांना आता हिसका दाखवतो.मात्र, साखर कारखानदारांनी दराबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. साखर कारखाने सुरू झाल्यानंतरच याबाबत चर्चा होईल, असे एका साखर कारखान्याने सांगितले आहे. मात्र, कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी मान्य केली नाही तर, शेतकरी संघटना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे..जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत ऊस लागवडीचे क्षेत्र तेवढेच असले तरी मेपासून सुरू झालेल्या पावसामुळे उताऱ्यात घट येण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने सरासरी प्रतिहेक्टरी ७७ टन इतकी उत्पादकता त्यांच्या अहवालात नमूद केली आहे. गेल्या तीन हंगामांचा विचार केला तर ऊस लागवड क्षेत्रात फारशी घट नाही. मात्र, सततच्या पावसामुळे एकरी ७ ते १० टन उत्पादन घट शक्य असल्याची चर्चा साखर कारखानदापरांमध्ये सुरू आहे.गाळपास येणारा ऊस लागण हंगाम क्षेत्र (हेक्टरमध्ये)आडसाली ४४९१४पूर्वहंगामी २२८०६सुरू १७७४८खोडवा ५३४३४एकूण १३८९०४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.