Ahilyanagar News : साखर कारखान्याचा हंगाम सुरू झाला असताना बहुतांश कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत. ज्यांनी दर जाहीर केले ते दर कमी आहेत. त्यामुळे उसाला पहिली उचल ३४०० असावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे..शुक्रवारी (ता.३१) या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने साखर कारखाना, विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्यात काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे..Sugarcane Bill Deduction : उसाचा काटा मारणाऱ्यांना आता हिसका दाखवतो.राज्यातील ऊस गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत असला तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस दराबाबत फारसे गांभिर्याने घेतले जात असल्याचे दिसत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र ऊसदराबाबत भूमिका मांडली असून मागील हंगामातील २०० फरक रक्कम अदा करावी आणि चालू हंगामाची पहिली उचल ३४०० प्रति टन निश्चित केल्याशिवाय ऊस तोडणी व वाहतूक सुरू होणार नाही असा इशारा दिला आहे. .सध्या साखरेचे दर बाजारात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. साखरेचा भाव ४२०० ते ४४०० प्रति क्विंटल दरम्यान पोहोचला असून कारखानदारांना विक्रमी नफा होत असताना शेतकऱ्यांच्या ऊसाला मात्र चांगला दर देण्यापासून वंचित ठेवले जात आहे. या वर्षी खत, मजुरी, वाहतूक आणि डिझेलचा खर्च प्रचंड वाढला आहे. मात्र शेतकऱ्यांना मागील वर्षी सत्तावीस रुपये दर देऊन शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. .अन्यायकारक असून आम्ही आता गप्प बसणार नाही. संघटनेचा आरोप आहे, की कारखानदार व साखर व्यवस्थापन मंडळ यांच्यात संगनमत होऊन शेतकऱ्यांचे दर जाणीवपूर्वक कमी ठेवले जात आहेत. उत्पादन खर्च, साखरेची वाढलेली किंमत आणि नफा लक्षात घेता शेतकऱ्यांचा योग्य दर किमान ३४०० पहिली उचल आणि ३६०० अंतिम दर असावा अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे. .Sugarcane Bill : उसाला पहिली उचल विनाकपात की तुकड्यात? .स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य नेते राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली लवकरच अहिल्यानगर जिल्ह्यात मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्याण शुक्रवारी (ता.३१) या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने साखर कारखाना, विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ऊसदराबाबत भूमिका घ्यावी अशी मागणीही संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, बाळासाहेब फटांगरे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे..‘ऊस काटामारी थांबवा’स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या हक्काचा दर देण्यास टाळाटाळ केली, तर ऊस तोडणी पूर्णपणे बंद केली जाईल आणि जिल्हाभर शेतकरी रस्त्यावर उतरतील. साखर कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काटामारी, वजनात कपात आणि रस चोरीसारखे प्रकार वाढले आहेत. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. साखर कारखान्यात होणारी काटामारी तातडीने थांबवावी अन्यथा अंदोलन उभारू, असा इशारा दिला आहे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.