Pune News: इथेनॉलसाठी ऊस गाळप करताना साखर उतारा चोरी होत असल्याची तक्रार साखर उद्योगातील तज्ज्ञ गटाने केली आहे. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने साखर आयुक्तालयाने याबाबत चौकशीसाठी पावले टाकली आहेत. .‘फोरम ऑफ इंटलेक्च्युअल्स’च्या ‘टास्क फोर्स शुगर कोअर कमिटी’ने उतारा चोरीकडे गेल्या हंगामात लक्ष वेधले होते. फोरमच्या शिष्टमंडळाने अलीकडेच साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत चौकशीची मागणी केली. कोणत्या साखर कारखान्याने इथेनॉलकडे किती ऊस वळवला, .Ethanol Policy : इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळतो; केंद्रीय मंत्री जोशींचा दावा.वळवलेल्या उसाचा तपशील उतारा काढण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडे (व्हीएसआय) पाठवली का, पाठवलेल्या तपशीलात त्रुटी असल्यास त्याची तपासणी होते का, तसेच उतारा न तपासणाऱ्या कारखान्यांवर काय कारवाई केली जाते, असे कळीचे मुद्दे फोरमने आयुक्तांसमोर उपस्थित केले..‘टास्क फोर्स’चे समन्वयक सतीश देशमुख म्हणाले, ‘‘आम्ही २०२२-२३ मधील गाळपातील उतारा चोरीचे मुद्दे पुराव्यांसह आयुक्तालयाकडे दिले होते. आता २०२३-२४ व २०२४-२५ मधील मुद्दे तपासण्याची जबाबदारी आयुक्तालयाची आहे. तसेच, येत्या २०२५-२६ मधील हंगामातील उतारा चोरी रोखणे व शेतकऱ्यांना कमी एफआरपी मिळणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारीदेखील आयुक्तालयाची आहे. .Ethanol Policy : सर्वहितकारक धोरण.फोरमचे तांत्रिक मुद्दे व शंका साखर आयुक्तांनी सकारात्मकपणे विचारात घेतल्या आहेत. तसेच या प्रकरणी माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. उतारा चोरी करणाऱ्या कारखान्यांची यादी आता आयुक्तालयाने सार्वजनिक करायला हवी. ती न केल्यास शेतकरी हितार्थ ती यादी फोरमकडून जाहीर केली जाईल.’’.राज्यातील अनेक कारखान्यांनी २०२२-२३ मधील गाळप हंगामात इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. तसेच, अनेक कारखान्यांनी अतिरिक्त बी हेवी मोलासिस तसेच स्टँड अलोन इथेनॉल कंपनीला किंवा दुसऱ्या साखर कारखान्यांना विकले आहे. मात्र, व्हीएसआयकडून उतारा दुरुस्ती प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे अशा कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी फोरमने केली आहे..‘...तर आरआरसी कारवाई करा’‘‘उतारा प्रमाणीकरणाची प्रक्रिया अर्धवट ठेवणाऱ्या व शेतकऱ्यांना सुधारित एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ची कारवाई करावी, सुधारित उताऱ्याबाबत व्हीएसआयचे प्रमाणपत्र प्रत्येक कारखान्याने जाहीर करावे. पारदर्शकतेसाठी इथेनॉल निर्मिती क्षमता, उत्पादन तक्ता दर वर्षी जाहीर करण्याची सक्ती आयुक्तालयाने कारखान्यांवर करावी,’’ असा आग्रह फोरमने धरला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.