Sindhudurg News: ढगाळ वातावरण व सततच्या धुक्यामुळे काजू पिकावर प्रतिकूल परिणाम झाला असून काजूची कोवळी बी काळवंडत असल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात ‘ॲग्रोवन’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वैभववाडी तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी खांबाळे येथे जाऊन काजू बागांची पाहणी केली. या पाहणीत ढेकण्यांचा प्रादुर्भाव असल्याचे स्पष्ट झाले आहे..जिल्ह्यात यंदा थंडीचे प्रमाण जास्त असल्याने काजू पिकांमध्ये मोहोर अधिक दिसून येतो; मात्र दीर्घकाळ थंडी राहिल्याने अपेक्षित प्रमाणात फळधारणा झाली नाही. तरीही काही प्रमाणात उत्पादन मिळेल, या अपेक्षेने काजू बागायतदार प्रयत्नशील आहेत..Cashew Crop: सिंधुदुर्गात काजू पिकावर तापमानाचा परिणाम, मोहर करपला.जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात ढगाळ वातावरणासह सतत धुके राहिल्याने दमट परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काजू पिकांवर बुरशीजन्य रोगांसह फळ पोखरणारी अळी व ढेकण्यांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले. परिणामी अनेक ठिकाणी काजूची कोवळी बी काळवंडत असल्याचे चित्र होते..Cashew Crop : सिंधुदुर्गात थंडीमुळे काजूला पालवी फुटण्याची प्रक्रिया सुरू .या स्थितीबाबत ३१ जानेवारी रोजी ‘ॲग्रोवन’मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत कृषी विभागाने मंगळवारपासून तालुक्यातील काही गावांमध्ये बागांची पाहणी सुरू केली आहे. बुधवारी सागुंळवाडी कृषी महाविद्यालयाचे प्रा. निखील फुटणकर, मंडळ कृषी अधिकारी उत्तम मंदवाड व सहायक कृषी अधिकारी मिनाक्षी भुजंग यांनी खांबाळे (ता. वैभववाडी) येथील काजू उत्पादक मंगेश गुरव यांच्या बागेसह अन्य दोन-तीन बागांची पाहणी केली..या पाहणीत ढेकणे व बी पोखरणारी अळी आढळून आली. काही बागांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरताही दिसून आली. ज्या शेतकऱ्यांनी वेळीच नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या आहेत, त्यांच्या बागांमध्ये तुलनेने प्रादुर्भाव कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. या वेळी शेतकऱ्यांना योग्य कीटकनाशकांची फवारणी व व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.