Nagpur News : नागपूर ग्रामीण तालुक्यातील सर्व ६५४ पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा पंधरवडा’ चे औचित्य साधून, महसूल विभागाने ग्रामीण रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग आणि शेतरस्त्यांचे नकाशे तयार करून नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. .या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ६५४ पाणंद रस्त्यांची पडताळणी पूर्ण झाली असून, हे रस्ते गावनकाशांवर सीमांकित करण्यात आले आहेत. तयार केलेले नकाशे सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये आणि नागपूर ग्रामीण तालुका कार्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. .Farm Roads: शेतरस्ते, पाणंद रस्त्यांना मिळणार क्रमांक.यामुळे ग्रामीण रस्त्यांबाबत अधिकृत माहिती पारदर्शकपणे आणि सोप्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचणार आहे. शासनाने २२ मे २०२५ आणि २९ ऑगस्ट २०२५ च्या निर्णयानुसार, गाव दप्तरात नोंद नसलेल्या नवीन रस्त्यांचे वर्गीकरण, त्यांच्या अधिकार अभिलेखातील नोंदी आणि सीमांकन करून विशिष्ट क्रमांक देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. .यासाठी मानक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण रस्त्यांबाबत अचूक माहिती उपलब्ध होणार असून अतिक्रमणांना आळा घालण्यास मदत होणार आहे. ही मोहीम महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून, जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या नियोजनानुसार राबवण्यात आली..Farm Road: गावशिवार रस्त्यांचे होणार सीमांकन.अशी आहे मानक पद्धतगावस्तरावर रस्त्यांची यादी तयार करणे. अतिक्रमित रस्त्यांबाबत प्रस्ताव तयार करणे. ग्रामसभेत प्राथमिक यादी ठेवणे. भूमी अभिलेख विभागामार्फत सीमांकन करणे. रस्त्यांच्या एकत्रित नोंदी तयार करणे, विशिष्ट क्रमांक निश्चित करणे असे आहे. .पहिल्या दोन टप्प्यांची कार्यवाही पूर्ण झाली असून, सीमांकनाचे काम भूमी अभिलेख विभागाकडून सुरू आहे. ‘सेवा पंधरवडा’ कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.