Amravati News: तापी नदीवर मेळघाटातील खारिया गुटीघाट येथे वळण बंधारा बांधण्यात येणार असून या आंतरराज्य प्रकल्पाच्या सर्व्हेक्षण आणि अन्वेषणासाठी ३० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. अद्याप ते कामही सुरू झालेले नाही. या प्रकल्पासाठी १९ हजार २४४ कोटी रुपयांचा खर्च अंदाजित करण्यात आला आहे..तापी नदीवर वळण बंधारा बांधून पावसाळ्यात तापी नदीचे पुराचे पाणी उजव्या कालव्याद्वारे मध्य प्रदेशातील नेपानगर, बऱ्हाणपूर व महाराष्ट्रातील रावेर, यावल, चोपडा या तालुक्यांत तसेच डाव्या कालव्याद्वारे महाराष्ट्रातील धारणी व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, खकनार या तालुक्यातील नदी, नाल्यात पूर कालव्याचे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. .Maharashtra Development: समतोल विकासाचे ‘द्रविडीयन प्रारुप’.डावा कालवा टप्पा-दोनद्वारे जळगाव जामोद, तेल्हारा, संग्रामपूर अकोट, अचलपूर या विदर्भाच्या तालुक्यातील कालव्यास छेदणाऱ्या ठिकठिकाणच्या नदी, नाल्यात पूर व कालव्यांचे पाणी सोडून नदी, नाल्यांमध्ये भूमिगत बंधारे, गॅबीअन बंधारे, पुनर्भरण विहिरी, पुनर्भरणदंड (शाफ्ट) इंजेक्शन वेल्स व साठवण बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्याद्वारे भूजल पुनर्भरण करण्यात येणार आहे. सद्यःस्थितील खोल गेलेली भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावणे व वळण बंधाऱ्याच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या पाणीसाठ्यांद्वारे प्रत्यक्ष सिंचन करण्यात येणार आहे..या प्रकल्पामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील ३.५ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून यामध्ये २.३४ लाख महाराष्ट्र व १.२३ लाख हेक्टर मध्य प्रदेशातील क्षेत्राचा समावेश आहे..Maharashtra Development: भुसभुशीत पायावरचा भक्कम विकास .साधारणतः वीस वर्षांपूर्वी तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाची योजना आखण्यात आली आहे. तापी नदीवर अमरावती जिल्ह्यातील धारणी नजीकच धूळघाट येथे हा प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र बुडित क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यास प्रचंड विरोध झाला. त्यामुळे जागा बदलण्यात येऊन आता तो खारिया घुटीघाट येथे प्रस्तावित करण्यात आला आहे. मे २०२५ मध्ये महाराष्ट्र व मध्य प्रदेशमध्ये सामंजस्य करार करण्यात आला असून सर्वेक्षण व अन्वेषणाच्या द्वितीय सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात आली..सद्यःस्थितीत संपूर्ण खर्च महाराष्ट्र राज्याने करावयाचा आहे. मध्य प्रदेश राज्याकडून त्यांच्या हिश्श्याच्या रकमेचा परतावा घेण्यात येणार आहे. महाकाय पुनर्भरण योजनेचे सर्वेक्षण व अन्वेषणासाठी तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी लागणाऱ्या ३० कोटी रुपयांच्या खर्चास आता द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी १९ हजार २४४ कोटी रुपये खर्च अंदाजित करण्यात आला असून यातील ९० टक्के निधी केंद्राकडे मागण्यात येणार आहे..तापी मेगा रिचार्ज प्रकल्पस्थळ ः तापी नदीवर धारणी तालुक्यात खारिया घुटीघाटसहभागी राज्य ः महाराष्ट्र व मध्य प्रदेशएकूण जलसाठा ः ३१.१३ टीएमसीदोन्ही राज्यांचा वाटा ः महाराष्ट्र ः १९.३६ टीएमसी, मध्य प्रदेश ः ११.७६ टीएमसीलाभ मिळणार ः बऱ्हाणपूर, खंडवा (मध्य प्रदेश)जळगाव, अकोला, बुलडाणा, अमरावतीलाभक्षेत्र ः ३.५० लाख हेक्टर (१.२३ लाख हेक्टर मध्य प्रदेश व २.३४ लाख हेक्टर महाराष्ट्र).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.