Jalna News: अंबड तालुक्यातील चांभारवाडी येथील दुधना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने मोठी कारवाई केली. यात एक ट्रॅक्टर, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि तीन मोबाइल जप्त करण्यात आले.महसूल पथकाची रेकी करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी मिसाळ, उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रशासनाने वाळूमाफियांविरोधात उघडलेली मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले..काही दिवसांपासून चांभारवाडी येथील दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या अनुषंगाने ग्राम महसूल अधिकारी स्वप्निल खरात, महसूल सहायक श्याम विभुते आणि महसूल सेवक विकास डोळसे यांचे पथक चांभारवाडी येथे गेले होते.पथक कारवाईसाठी जात असतानाच वाळूतस्करांचे साथीदार करण गणेश शिंदे व सनी हिवाळे हे महसूल पथकाचे ‘लोकेशन’ घेण्यासाठी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत असल्याचे लक्षात आले.ऋषी गणेश शिंदे हा त्याच्या मामाच्या मुलाचे ट्रॅक्टर वापरून विनापरवाना एक ब्रास वाळू वाहतूक करत होता. मात्र, महसूलच्या पथकाची चाहूल लागताच त्याने आलमगाव येथे वाळू खाली केली व ट्रॅक्टर आलमगाव रोडवर आणून उभा केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पथकाने तत्काळ तहसीलदार विजय चव्हाण यांना संपर्क साधला..Illegal Sand Mining: अवैध वाळू उत्खननावर ‘महसूल’ची धडक कारवाई .तेव्हा चव्हाण आणि अव्वल कारकून रमेश वालेकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रॅक्टरची बारकाईने पाहणी केली असता, ट्रॉलीला वाळू चिटकलेली दिसली. त्यावरून हे ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले.ऋषी गणेश शिंदे, करण गणेश शिंदे व सनी हिवाळे यांचे तीन मोबाइलही जप्त करण्यात आले असून, वाळू उपशाचे मोठे रॅकेट असल्याचे मोबाइलच्या तपासणीत समोर आले. दरम्यान, घोटन येथील रोहित संजय जगताप हा जेसीबीद्वारे वाळू उत्खननासाठी मदत करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पातळीवरून अवैध गौण खनिजाबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबिण्यात आले असून, अशा प्रकारच्या सक्त कारवाया यापुढेही निरंतर सुरू राहणार आहेत..Illegal Sand Mining : अवैध वाळूउपशा विरोधात ‘महसूल’ची कारवाई जोरात.मोबाइलमध्ये सापडले पुरावेमोबाइलमध्ये महसूल पथकाचे लोकेशन शेअर केल्याचे पुरावे, वाळूच्या ऑर्डर्स, वाहतूक आणि उत्खननाचे कॉल रेकॉर्डिंग, फोटो आणि व्हिडिओ मिळाले आहेत. यावरून अनेक दिवसांपासून रॅकेट सक्रिय असून, यात अनेक लोकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे..तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कडक मोहीम राबविली जात आहे. शासकीय कामात अडथळा आणणे किंवा अधिकाऱ्यांची पाळत (रेकी) करणे खपवून घेतले जाणार नाही. वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाच्या या सक्त कारवाया यापुढेही अविरत सुरूच राहतील.- विजय चव्हाण, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, अंबड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.