Parbhani Agriculture Update: परभणी जिल्ह्यात २०२५-२६ पर्यंतच्या तीन वर्षांत रासायनिक खतांचा सरासरी वापर १ लाख १२ हजार १० टन झाला आहे. यापूर्वीच्या तीन वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील सरासरी खतवापरात ११ हजार ४२ टनांची वाढ झाली आहे. रासायनिक खतांचा अतिरिक्त आणि असंतुलित वापर होत असल्याने जमिनीची सुपीकता तसेच पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे..परभणी जिल्ह्यात २०२४-२५ पर्यंतच्या तीन वर्षांत रासायनिक खतांचा सरासरी वापर १ लाख ९६८ टन होता. तर २०२३-२४ पर्यंतच्या तीन वर्षांत हा सरासरी वापर ७२ हजार ३ टन होता. दरवर्षी रासायनिक खतांच्या वापरात वाढ होत आहे. जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसार खतांच्या मात्रा दिल्या जात नसल्याचे सर्वसाधारणपणे दिसून येते. अनावश्यक आणि अतिरिक्त खतवापरामुळे जमिनीचे आरोग्य खालावत असून उत्पादन खर्चातही वाढ होत आहे..Urea Fertilizers Shortage: अहिल्यानगरला युरिया खत मिळेना.परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी (एप्रिल ते सप्टेंबर) विविध ग्रेडच्या १ लाख ७७ हजार ७५० टन रासायनिक खतांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी कृषी आयुक्तालयाने १ लाख ६१ हजार १०० टन खतांना मंजुरी दिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १५ हजार ९८६ टन अधिक खतांना मंजुरी मिळाली आहे..हिंगोली जिल्ह्यात २०२५-२६ पर्यंतच्या तीन वर्षांत रासायनिक खतांचा सरासरी वापर ८१ हजार ५६९ टन आहे. त्याआधीच्या तीन वर्षांत हा सरासरी वापर ८४ हजार २७० टन होता. यंदाच्या खरीपासाठी विविध ग्रेडच्या ९० हजार १५ टन खतांची मागणी असताना कृषी आयुक्तालयाने ९८ हजार ३०० टन खतांना मंजुरी दिली आहे. म्हणजेच मागणीपेक्षा ८ हजार २८५ टन अधिक खतांचा पुरवठा मंजूर करण्यात आला आहे..Fertilizers Management: खतांच्या योग्य वापरावर द्या भर....दीड लाख टन खतांची विक्रीयंदाच्या खरीप हंगामात परभणी व हिंगोली जिल्ह्यांत जुलैअखेरपर्यंत विविध ग्रेडच्या १ लाख ४९ हजार ८५८ टन खतांची विक्री झाली आहे.परभणी जिल्ह्यात मार्चअखेरची ६२ हजार १५५ टन शिल्लक आणि १ एप्रिल ते जुलैअखेरपर्यंत प्राप्त झालेली ६५ हजार ६९७ टन खते मिळून एकूण १ लाख २७ हजार ८५३ टन खतांचा साठा उपलब्ध होता. मंगळवार (ता. २८) पर्यंत ८९ हजार २२० टन खतांची विक्री झाली. त्यामध्ये युरिया २१ हजार २१ टन, डीएपी ११ हजार १३६ टन, पोटॅश २ हजार ११५ टन, एनपीके ४३ हजार १८६ टन आणि सिंगल सुपर फॉस्फेट ११ हजार ५६२ टन खतांचा समावेश आहे..हिंगोली जिल्ह्यात मार्चअखेरची ४५ हजार १९२ टन शिल्लक आणि १ एप्रिलपासून प्राप्त झालेली ४६ हजार ७०२ टन खते मिळून एकूण ९१ हजार ८९४ टन खतांचा साठा उपलब्ध होता. बुधवार (ता. २९) पर्यंत विविध ग्रेडच्या ६० हजार ६३८ टन खतांची विक्री झाली. त्यामध्ये युरिया ११ हजार ४२८ टन, डीएपी ५ हजार ६५० टन, पोटॅश २ हजार ६६ टन, एनपीके २८ हजार ५२७ टन आणि सिंगल सुपर फॉस्फेट १२ हजार ९६५ टन खतांचा समावेश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.