Maharashtra Politics: शेतकरी कर्जमाफी योजनेतील (Farm Loan Waiver Scheme) नियम, अटींवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काळ्या मातीचा इमान राखणारा, तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या शेतकऱ्याला कसले नियम, कायदे लावता? असा संतप्त सवाल त्यांनी केला. .त्या मुंबईत पत्रकार परिषद बोलत होत्या. राज्यातील १२ लाख शेतकऱ्यांची यादी सरकारने बँकांना परत पाठवल्याने त्यांच्या कर्जमाफीस विलंब होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकारचा इतका असंवेदनशीलपणा मी कधीच पाहिला नाही. या सरकारचे सगळे काम निवडणूक केंद्रित असतात. निवडणुका जवळ आल्या की दोन्ही हातांनी त्यांचे सगळे निर्णय होतात. निवडून आल्यानंतर सत्तेत बसले की दोन्ही हात घट्ट धरून त्यांचे काम चालते. .Farm Loan Waiver: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा महत्त्वाचा खुलासा.ज्यावेळी पेपरफुटी होते; तेव्हा नियम, कायदे, तंत्रज्ञान येत नाही. आमच्या गरीब लोकांची जेव्हा वेळ येते तेव्हा या सरकारला सगळे, नियम, कायदे लागतात. या असंवेदनशील सरकारचा आम्ही जाहीर निषेध करते, अशा शब्दांत सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.शेतकरी आणि लाडकी बहीण यांच्यासंदर्भात सरकारने जो असंवेदनशीपणा दाखवला आहे, तो अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. .Farm Loan Waiver: कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित, ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार कोटी जमा, मुख्यमंत्र्यांची माहिती.राज्यातील आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण झालेल्या ६.२२ लाख पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर एकूण ५ हजार ०२८ कोटींची रक्कम सरकारकडून हस्तांतरित करण्यात आली आहे. पण १२ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे त्यांच्या कर्जमाफीस विलंब होण्याची शक्यता आहे..शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ८ खासदार पंतप्रधानांना भेटणारमहाराष्ट्रांतील प्रश्न घेऊन सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. पाण्याचे प्रश्न, शहरीकरणामुळे होणाऱ्या मोठ्या समस्या असतील. सगळ्या खासदारांना दरवर्षी ५ कोटी विकास निधी मिळतो. पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी आव्हाने येत आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारकडून अपेक्षित मदत खासदारांना मिळत नाहीत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले..आम्ही हे सगळे प्रश्न घेऊन पंतप्रधानांकडे जाणार आहोत. त्यासाठी अधिकृतपणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आठ लोकसभा खासदारांनी विनंती करुन वेळ मागितली होती. त्यासाठी पंतप्रधानांनी सोमवारी सकाळी ११ वाजता संसदेच्या त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी वेळ दिला आहे. त्यासाठी आठ खासदार महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी पंतप्रधानांना भेटणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.