Farm Tourism: वाणगाव येथील कृषी तंत्र विद्यालय, आसनगावच्या प्रक्षेत्रावर यंदा प्रायोगिकतत्त्वावर आकर्षक सूर्यफुलाची लागवड करण्यात आली आहे. ही सूर्यफुलांची शेती मुंबई, पुण्यासह गुजरातच्या पर्यटकांना आकर्षित करीत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून शेती तंत्रज्ञान, फलोत्पादन आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पिकांचे अद्ययावत तंत्रज्ञान दिले जात असल्याची माहिती कृषी प्रतिष्ठानचे सचिव विलास राऊन यांनी दिली. .वसई, विरारपासून ते अगदी पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने तरुण-तरुणी, महिलावर्ग रील्स बनविण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आसनगावच्या कृषी नगरीत येत आहेत..Sunflower Farming: सूर्यफूल पिकाच्या शेतीने समृद्धीकडे वाटचाल .सूर्यफूल लागवड प्रक्षेत्रावर ठरावीक ठिकाणी मधमाशी पेट्यादेखील बसवण्यात आल्या आहेत. सूर्यफुलाकडे मधमाश्या मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. मधमाश्यांद्वारे सर्वात जास्त परागीभवन होते. सूर्यफूल लागवडीमुळे मधमाश्या परागीभवन घडवून आणतात. त्यामुळे मधाचेही उत्पन्न वाढते आणि सूर्यफुलाच्या उत्पादनातही लक्षणीय वाढ होते..Sunflower Farming: घाटनांद्रा परिसरात बहरली सूर्यफुलाची शेती.पर्यटकांचे सूर्यफूल शेतीला विशेष आकर्षण असल्यामुळे उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण होण्यास मदत झाली आहे. सूर्यफूल लागवडीमुळे सूर्यफुलाचे विशेष आकर्षण आहेच, परंतु शुद्ध खाद्यतेल, उत्पादन, पेंड आणि मधमाश्यांना आकर्षित करणारे पीक असल्याने मधाचेही उत्पन्न आणि वर्षभर घरगुती तेलाची गरज भागवता येत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने सूर्यफुलाची लागवड करून आर्थिक घडी बळकट केली आहे..आधुनिकतेचा वापरपूर्णपणे सेंद्रिय शेती परागीभवण्यासाठी मधुमक्षिका पालन, ठिबक सिंचन, फर्टिगेशन, निळ्या आणि पिवळ्या रंगांच्या चिकट सापळ्यांचा वापर अशा आधुनिकतेचा वापर केल्याने विषमुक्त शेतीसाठी येथे प्रयत्न होत आहे. खाद्यतेल, मधाचे उत्पादन आणि सूर्यफुलाचे उत्पादन यातून विद्यार्थी सक्षम बनवू लागलेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.