Pune News : शासनाकडून तेलबिया पिकांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचा सूर्यफूल लागवडीकडे कल वाढत आहे. जिल्ह्यात बारामती तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी या पिकाची पेरणी केली आहे. त्यातून सूर्यफूल उत्पादकांना चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे..पुणे जिल्ह्यातील शेतकरी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीच्या आणि खात्रीशीर उत्पादन देणाऱ्या पिकांकडे वळत आहेत. सूर्यफूल हे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. जिल्ह्यात सूर्यफुलाचे सरासरी ५७९ हेक्टर इतके क्षेत्र असून त्यापैकी ४८३ हेक्टर म्हणजेच ८३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. .Sunflower Cultivation : शेतकऱ्यांना सूर्यफूल लागवडीची ओढ.एकट्या बारामती तालुक्यात सरासरी ३२१ हेक्टर म्हणजेच ६२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तालुक्यात पोषक हवामान आणि शासनाकडून प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे या भागात सूर्यफूल क्षेत्रात वाढ होत असून पेरणीस गती मिळाली आहे. सूर्यफुलाचे उत्पादन हे पर्यायी आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे..सूर्यफूलाकडे वाढतोय कल ःसूर्यफूल हे कमी कालावधीचे म्हणजे ८० ते ९० दिवसांचे पीक आहे. त्यासाठी विशेष कीटकनाशके अथवा खते तुलनात्मकदृष्ट्या कमी लागत असल्याने उत्पादन खर्चही कमी येतो. दुसरीकडे, मागील वर्षीच्या तुलनेत बाजारात तेलबियांना चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. .Sunflower Farming: खानदेशात सूर्यफुलाची पेरणी सुरू.उत्पादनानंतर लगेच विक्री शक्य होते, तसेच मागणीही स्थिर असल्यामुळे शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी सुर्यफूलाकडे वळत आहेत. योग्य काळजी घेतल्यास हेक्टरी ८ ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. यंदा हवामान पोषक राहिल्यास उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. .सूर्यफूल तेलाला बाजारमूल्यही चांगले राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी झालेले पीक ऑक्टोबर महिन्यात काढणीसाठी तयार होईल. त्यामुळे आगामी काळात पीक काढणीसाठी आवश्यक यंत्रांची उपलब्धता व बाजारपेठेची चाचपणी करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.जिल्ह्यात सुर्यफुलाची झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)तालुका --- सरासरी क्षेत्र -- पेरणी क्षेत्र -- टक्केबारामती --- ५२२ -- ३२१ -- ६२पुरंदर -- २४ -- ९० -- ३७९दौंड -- १० -- ५६ -- ५६०शिरूर -- २ --- ६ -- ३२७हवेली -- ३ -- १० -- ३१७जुन्नर --- १३ -- ० --- ०इंदापूर -- ६ --० --०एकूण -- ५७९ -- ४८३ -- ८३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.