Maharashtra Politics: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विक्रमी २ लाख १८ हजार ८०६ मतांनी विजयी झाल्या. सोमवारी (ता. ४) बारामतीमध्ये मतमोजणी पार पडली. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली..या पोटनिवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली होती. मतमोजणी दरम्यान मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम होती..West Bengal Election Results 2026: ममतांच्या हातून पश्चिम बंगाल निसटलं, भाजपची जोरदार मुसंडी.दरम्यान जय पवार हे कार्यकर्त्यांसमवेत मतमोजणी केंद्रामध्ये थांबून होते. आई सुनेत्रा यांचा ऐतिहासिक विजय होणार हे स्पष्ट झाल्यानंतर ते विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावर गेले. तेथे नतमस्तक होत हा विजय अजित पवार यांना अर्पण केला..या प्रसंगी जय यांचे डोळे भरून आले होते. काही वेळ त्यांनी त्या ठिकाणी बसून दादांच्या स्मृतींना उजाळा दिला. पोटनिवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.